
Rahul Gandhi News Updates: मोदी सरकारविरोधात आक्रमकपणे भूमिका मांडणारे काँग्रेसचे (Congress) नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांना मोठा धक्का बसला. राहुल गांधी यांची खासदारकी रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला ज्यामुळे देशाच्या राजकारणात मोठी खळबळ माजली आहे. या निर्णयानंतर मोदी सरकारविरोधात सर्वच विरोधी पक्षांनी आक्रमक भूमिका घेत आंदोलने छेडली आहेत.
याच पार्श्वभूमीवर सरकारी कामात अडथळा आणल्या प्रकरणात प्रहारचे आमदार बच्चू कडू यांना नाशिकमधील सत्र न्यायालयाने दोन वर्षांची शिक्षा सुनावली आहे, त्यामुळे त्यांची आमदारकी कधी रद्द होणार? असा सवाल राष्ट्रवादीने उपस्थित केला आहे. पुण्यात राष्ट्रवादीकडून बॅनरबाजी करण्यात आली आहे. (Pune News)
याबाबत अधिक माहिती अशी की, सुरतच्या एका न्यायालयाने गुरुवारी काँग्रेस नेते राहुल गांधी यांना 'मोदी आडनाव' संबंधी केलेल्या टिप्पणीबद्दल 2019 मध्ये दाखल केलेल्या फौजदारी मानहानीच्या खटल्यात दोषी ठरवलं आहे. त्यामुळे त्यांची खासदारकी रद्द झाली. या निर्णयानंतर देशभरात भाजपविरोधात संतापाची लाट पसरल्याचे पाहायला मिळत आहे.
या निर्णयानंतर राष्ट्रवादी (NCP) युवा कॉंग्रेसने पुण्यात बॅनर लावत बच्चू कडूंची (Bachchu Kadu) आमदारकी कधी रद्द होणार, असा सवाल उपस्थित केला आहे. आमदार बच्चू कडूंना नाशिक जिल्हा सत्र न्यायालयाने दोन वर्षांची शिक्षा सुणावली आहे, त्यांची आमदारकी कधी रद्द होणार, नियम सर्वांना सारखेच पाहिजेत, अशा आशयाचे बॅनर पुण्यामध्ये झळकावले आहेत.
दरम्यान, राहुल गांधींची खासदारकी रद्द करण्याचा निर्णय झाल्यानंतर विरोधी पक्ष आक्रमक झाले आहेत. ही लोकशाहीची हत्या झाल्याचे अनेक नेत्यांनी या निर्णयाचा निषेध व्यक्त केला आहे. आजही कॉंग्रेस, राष्ट्रवादीकडून ठिकठिकाणी आंदोलने करण्यात येणार आहेत.
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.