'राहुल गांधींना ED ने चौथ्यांदा बोलावलं, मग अनिल परबांना कशाची भीती वाटतेय?'

'शिवसेनेला स्पष्टपणे सांगतोय आमदारांना धमक्या द्यायची माफिया भाषा बंद करा'
Anil Parab News, Rahul Gandhi News
Anil Parab News, Rahul Gandhi NewsSaam TV

मुंबई : अनिल परब यांनी ईडीकडे मुदत मागितली असली तरी बुलावा आया है, जाना तो पडेगा; राहुल गांधींना चौथ्यांदा बोलवलं मग, अनिल परब (Anil Parab) यांना कशाची भीती वाटते असा सवाल उपस्थित करत भाजप नेते किरीट सोमय्या यांनी परब यांच्यावर निशाणा साधला. (Anil Parab Latest Marathi News)

परिवहन मंत्री तथा शिवसेना (Shivsena) नेते अनिल परब यांना ईडीचं समन्स बजावण्यात आल्यानंतर ते अजून चौकशीसाठी हजर झाले नाहीतच. मात्र, ते ED चौकशीला जाण्याऐवजी शिर्डीला गेले होते. या सर्व पार्श्वभूमीवर सोमय्या (Kirit Somaiya) यांनी परब यांच्यावर टीका केली.

तसंच शिवसेना काय आणि काँग्रेस काय, या माफियांनी जनतेला लुटलं आहे. एकाने पालिका लुटली आणि एकाने देशाला लुटले असंही ते म्हणाले. नॅशनल हेरॉल्ड ज्या वर्तमान पत्रासाठी शासनाने मोफत जमीन दिली. त्याच्यावर कमर्शिअल बिल्डिंग बांधून कंपनीत ट्रान्सफर केली. कंपनीला ५० लाख २ हजार कोटींची प्रॉपर्टी त्या कंपनीचे मालक कोण तर राहुल गांधी (Rahul Gandhi) लुटणाऱ्यांना जाब विचारला जातोय, अशोक चव्हाण आणि नाना पटोले यांच्यामध्ये उत्तर द्यायची हिम्मत आहे का? असंही सोमय्या यावेळी म्हणाले.

हे देखील पाहा -

दरम्यान, आमदार फोडाफोडी नाही तर ठाकरे सरकारने आता भाषा बदलली आहे. ते आमदारांना धमकी देत आहेत, राज्यसभा निवडणुकीत सहा आमदारांची नाव संजय राऊत यांनी, उद्धव ठाकरेंनी सांगितल्याप्रमाणे धमकी दिली होती. या राज्यसभेत नाक कापले जाऊ नये यासाठी नाही तर विधानपरिषद कपडे उतरवले जाऊ नयेत म्हणून, असा गंभीर आरोपही सोमय्या यांनी यावेळी केला.

तसंच शिवसेनेला स्पष्टपणे सांगतोय आमदारांना धमक्या द्यायची माफियांची भाषा बंद करा असा इशारा त्यांनी यावेळी सेनेला दिला. शिवाय सोमवारी माझ्याकडे आहे त्या टाईमटेबल प्रमाणे शिक्षण घेण्याचा माझा प्लान असून सोमवारी अजून एका मंत्रावर कारवाई होणार असल्याचे संकेत त्यांनी यावेळी दिले.

Edited By - Jagdish Patil

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com