ओमीक्रॉनच्या पार्श्वभूमीवर राहुल गांधींचा मेळावा रद्द - भाई जगताप

राज्यावर ओमीक्रॉनचे संकट असल्याने मेळावा पुढे ढकलण्यात आला आहे, अशी माहिती मुंबई कॉंग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे.
ओमीक्रॉनच्या पार्श्वभूमीवर राहुल गांधीचा मेळावा रद्द - भाई जगताप
ओमीक्रॉनच्या पार्श्वभूमीवर राहुल गांधीचा मेळावा रद्द - भाई जगतापSaam Tv

मुंबई: 28 तारखेला शिवाजी पार्कवर होणारा राहुल गांधी यांचा मेळावा पुढे ढकलला आहे. राज्यावर ओमीक्रॉनचे (Omicron) संकट असल्याने मेळावा पुढे ढकलण्यात आला आहे. राज्यसरकारने ज्या सूचना दिल्या आहेत त्याचे पालन करत काँग्रेसचा वर्धापनदिन साजरा केला जाईल अशी माहिती मुंबई कॉंग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप (Bhai Jagtap) यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे. (Rahul Gandhi's rally canceled on the background of Omicron - Bhai Jagtap)

हे देखील पहा -

भाई जगताप पुढे म्हणाले की, आम्ही न्यायालयात मेळावा मिळावा यासाठी दाद मागितली होती. आम्ही सरकारकडे 15 दिवसांपासून मागणी करत होतो, उत्तर आले नाही म्हणून आम्ही न्यायालयात गेलो होतो. राहुल गांधी यांच्या मेळाव्याची पुढची तारीख लवकरच कळवली जाईल. 137 वा काँग्रेसचा स्थापनादिन (137th congress Anniversary) साजरा केला जाईल. राहुल गांधी यांच्या कार्यालयाला आम्ही कळवले आहे. राहुल गांधी (Rahul Gandhi) यांची सभा पुढे शिवाजी पार्क येथे जरूर होईल. 9 ऑगस्टला आम्ही मुंबई महापालिका आयुक्त आणि राज्यसरकरकडे पत्र पाठवत सभेची परवानगी मागितली होती. सरकारकडून कोणतेही उत्तर आले नव्हते. तेजपाल ऑडिटोरीयम मध्ये काँग्रेसचा स्थापना दिन साजरा केला जाईल अशी माहिती भाई जगताप यांनी दिली.

ओमीक्रॉनच्या पार्श्वभूमीवर राहुल गांधीचा मेळावा रद्द - भाई जगताप
नवाब मलिक यांना धमकीचे पत्र; अत्यंत अश्लील भाषेत धमकी

मेळाव्याबाबत काँग्रेस नेत्यांशी मी बोललो होतो. कालपर्यंतचा ओमायक्रॉनचा आढावा घेतला आणि मग मेळावा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला. सरकारकडे मागणी केली होती सरकारने नकार दिला नव्हता. सोनिया गांधी यांनीही मेळाव्याला यावे अशी मागणी आम्ही केली होती. त्यांची तब्बेत बरोबर नाही म्हणून त्या व्हर्च्युअल संदेश देणार होत्या. 28 तारखेला राहुल गांधी वर्धापनदिनी व्हर्च्युअल सहभागी व्हावेत यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत. शिवाजी पार्कवर परवानगी नको ही शिवसेनेची (Shivsena) राजकीय भूमिका नाही. 20 तारखे नंतर ख्रिसमस सुट्टी असल्याने न्यायालयाच्या तारीखा मिळाल्या नसत्या म्हणून याचिका मागे घेतली असल्याचं भाई जगताप म्हणाले.

Edited By - Akshay Baisane

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com