Mangaon News : बिल्डिंगचं टेरेस, पायऱ्या, पार्किंगमध्ये रक्ताचा सडा; भलत्याच प्रकारामागचं गूढ काय?

रायगड जिल्ह्यातून धक्कादायक वृत्त हाती आलं आहे.
Mangaon News
Mangaon News Saam Tv

सचिन कदम

Mangaon News : रायगड जिल्ह्यातून धक्कादायक वृत्त हाती आलं आहे. रायगड जिल्ह्यातील माणगावमध्ये एका इमारतीच्या टेरेस, पायऱ्या आणि पार्कींगसह मुख्य रस्त्यावर रक्ताचा सडा पडला आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. इमारतीत नक्की काय घटना घडली, याबाबत उत्तर अनुत्तरीत आहे. या प्रकरणी पोलिसांनी पुढील तपास सुरू केला आहे. (Latest Marathi News)

Mangaon News
Mumbai News : मुंबईत इमारतीच्या २३ व्या मजल्यावरून लिफ्ट कोसळली; एका कामगाराचा मृत्यू

मिळालेल्या माहितीनुसार, रायगड जिल्ह्यातील माणगावमध्ये एका इमारतीच्या टेरेस, पायऱ्या आणि पार्कींगसह मुख्य रस्त्यावर रक्ताचा सडा पडला आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून नक्की काय घटना घडली याबाबत अद्याप स्पष्ट झालं नाही. एवढं रक्त कसं आणि कोणाच सांडलं याबाबत नागरीकांमध्ये उलट सुलट चर्चा सुरु आहेत.

माणगाव शहरातील उतेखोल वाडी भागातील महालक्ष्मी कॉम्पेक्सच्या ए आणि बी विंगच्या इमारत आणि परीसरात ही सर्व घटना घडली आहे. आज, बुधवारी सकाळी येथील रहिवाशांच्या रक्त सांडल्याची घटना निदर्शनास आल्यानंतर बघ्यांची एकच गर्दी झाली. या प्रकरणी माणगाव पोलीस घटनास्थळी दाखल झाले.

Mangaon News
Mumbai : मुंबईच्या विशेष पोलीस आयुक्त नियुक्तीवरून काँग्रेस नेत्याचा फडणवीसांवर गंभीर आरोप; म्हणाले...

या प्रकरणी पोलीस सांडलेल्या रक्ताचे नमुने घेऊन पुढील तपास करीत आहेत. येथील नागरीक देखील त्यांच्या परीने परिसरात तपास करीत आहेत. मात्र, या प्रकरणी कोणतीही माहिती पुढे आलेली नाही. परिसरात सीसीटीव्ही नसल्याने कोणताही धागादोरा पोलिसांच्या हाती मिळत नसल्याने तपास कामात अडचण निर्माण झाली आहे.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com