Raigad News : राेह्यातील घरफाेडी प्रकरणी शिर्डी, पुण्यातील युवकांना अटक; रायगड पाेलिसांसह LCB ची कामगिरी

रायगड पोलिस आणि स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने ही दमदार कारवाई केली
Raigad Police, Roha, Pune, Shirdi
Raigad Police, Roha, Pune, Shirdisaam tv

- सचिन कदम

Raigad Police News : रोहा (roha) येथेली घरफोडी प्रकरणाच्या तपासासाठी रायगड पाेलिसांनी (raigad police) शिर्डी (shirdi) आणि पुणे (pune) येथे छापा टाकले. त्यानंतर रायगड पोलिसांना दोन दरोडेखोरांना अटक करण्यात यश आले. दराेडेखाेरांकडून पाेलिसांनी (police) सोने (gold), चांदी (silver) दागिने आणि रोकड हस्तगत केली आहे. रसायनी आणि अलिबाग येथील घरफोड्या देखील उघड होण्याची शक्याता वर्तवली जात आहे.

Raigad Police, Roha, Pune, Shirdi
Satara News : पुण्याची सात फेटेवाला, साता-याची चॅटींग; नट-खट राज्य बाल एकांकिका स्पर्धेत यश

रायगड जिल्ह्यातील रोहा तालुक्यात झालेल्या घरफोडी प्रकरणी CCTV फुटेजच्या मदतीने तपास करीत असताना रायगड पोलिसांनी शिर्डी आणि पुणे येथुन दोन चोरट्यांना ताब्यात घेतले. नवनाथ गोर्डे (राहणार शिर्डी) आणि अतुल आमले (राहणार पुणे) अशी संशयितांची नावे आहेत.

Raigad Police, Roha, Pune, Shirdi
तरुणाई Gautami Patil च्या नृत्यावर फिदा, शो शांततेत...पण, गौतमी पाटील म्हणाल्या...

त्यांच्याकडुन एकूण 5 लाख 80 हजाराचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. या चोरट्यांनी रसायनी आणि अलिबाग परिसरात यापुर्वी घरफोड्या केल्याची कबुली दिली आहे. रायगड पोलिस आणि स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने ही दमदार कारवाई केली असुन या तपास कामबद्दल त्यांच कौतुक केल जात आहे. (Maharashtra News)

Edited By : Siddharth Latkar

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com