Railway News : रेल्वे प्रवाशांच्या खिशाला कात्री बसणार, प्लॅटफॉर्म तिकीटाचे दर गगनाला भिडले

रेल्वे प्रवाशांसाठी महत्वाची बातमी समोर आली आहे.
CSMT Railway Station
CSMT Railway Stationsaam tv

मुंबई : रेल्वे प्रवाशांसाठी महत्वाची बातमी समोर आली आहे. रेल्वे प्रवाशांच्या खिशाला कात्री बसणार आहे. कारण रेल्वे प्रशासनाने प्लॅटफॉर्म तिकीटाचा दर वाढवला आहे. तिकीटाचा दर 20 रूपयांवरून थेट 50 रुपये करण्यात आला आहे. (Railway platform ticket rates increases)

CSMT Railway Station
...म्हणून शिवसेना नेते भास्कर जाधव निशाण्यावर, का होतोय जाधवांना विरोध? वाचा सविस्तर रिपोर्ट

दिवाळी सणाच्या निमित्तानं रेल्वे स्थानकांवर (Railway Station) प्रवाशांची गर्दी वाढली आहे. त्यामुळे सीएसएमटी,दादर,ठाणे,कल्याण, एलटीटी आणि पनवेल स्थानकांवर प्रवाशांना प्लॅटफॉर्म तिकीटासाठी जादाचे पैसे मोजावे लागणार आहेत. हे नवे तिकीट दर उद्या शनिवारपासून लागू होणार आहेत. 31 ऑक्टोबरपर्यंत हे दर लागू असणार आहेत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com