दैव बलवत्तर म्हणून .... ! रेल्वेखाली आलेल्या वृद्धाचे वाचले प्राण (पहा व्हिडिओ)

थोडा जरी उशीर झाला असता तर त्या वृद्ध व्यक्तीला आपले प्राण गमवावे लागले असते.
दैव बलवत्तर म्हणून .... ! रेल्वेखाली आलेल्या वृद्धाचे वाचले प्राण (पहा व्हिडिओ)
दैव बलवत्तर म्हणून .... ! रेल्वेखाली आलेल्या वृद्धाचे वाचले प्राण (पहा व्हिडिओ)Saam Tv

मुंबई - कल्याण Kalyan रेल्वे स्थानकावरून Railway Station एक धक्कादायक व्हिडीओ समोर आला आहे. रेल्वे ट्रॅकवरुन Railway Track क्रॉस करणे धोकादायक असते. याबाबद वारंवार नागरिकांना आवाहन केले जाते. मात्र तरीही नागरिक नियम मोडून रेल्वे ट्रॅक क्रॉस करत असल्याचे दिसून येते. अनेकांना यामध्ये आपला जीव देखील गमवावा लागला आहे. 

तसाच काहीसा प्रकार कल्याण मध्ये घडला आहे याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. कल्याण रेल्वे स्टेशन येथील वयोवृ्द्ध व्यक्ती रेल्वे ट्रॅकवरुन क्राॅस करताना इंजिनच्या खाली आली. रेल्वे चालकाने तात्काळ आपात्कालिन ब्रेक दाबून प्रसंगावधान राखत त्या व्यक्तीचे प्राण वाचवले आहे. थोडा जरी उशीर झाला असता तर त्या वृद्ध व्यक्तीला आपले प्राण गमवावे लागले असते.

दैव बलवत्तर म्हणून .... ! रेल्वेखाली आलेल्या वृद्धाचे वाचले प्राण (पहा व्हिडिओ)
बैलांच्या बेकायदा शर्यतीवर पोलिसांची धडक कारवाई

मुंबईहून वाराणसीला जाणाऱ्या ट्रेनसमोर हा प्रकार घडला असल्याची माहिती समोर आली आहे. या संपूर्ण घटनेचा  व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. रेल्वे प्रशासनाकडून रेल्वे क्राॅस करणे जीवावर बेतू शकते असे नागरिकांना वारंवार  सांगितले जाते. मात्र तरीही अशा प्रकारच्या घटना सतत घडत असल्याचे पहायला मिळते. दरम्यान   रेल्वे वेळेत थांबवल्यामुळे वृद्ध व्यक्तीचा जीव वाचला आहे. यानंतर अनेक लोक तेथे जमा झाले होते.

Edited BY - Shivani Tichkule

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com