Rain In Pune: ऐन उन्हाळ्यात भर पावसाळा; पुण्यात बरसल्या अवकाळी पावसाच्या सरी

Rain In Pune: पुण्यात अवकाळी पावसाच्या सरी बरसल्या आहेत. पुण्यात सायंकाळी साडे पाचनंतर पावसाला सुरुवात झाली.
Rain In pune
Rain In puneSaamTv

सचिन जाधव

Pune News: पुण्यात अवकाळी पावसाच्या सरी बरसल्या आहेत. पुण्यात सायंकाळी साडे पाचनंतर पावसाला सुरुवात झाली. पावसाच्या सरी सुरू होताच नागरिकांची एकच धावाधाव झाली. या अवकाळी पावसाची शहरातील अनेक भागात पावसाची संततधार होती. (Latest Marathi News)

पुण्यात शिवाजीनगर,स्वारगेट,डेक्कन सह उपनगरात पावसाची हजेरी लावली. दिवसभर कडक उन्हानंतर सायंकाळी शहरातील अनेक भागात पावसाची संततधार पाहायला मिळाली.

पुणे वेधशाळेने शहरासह जिल्ह्यात देखील आज आणि उद्या पावसाचा अंदाज वर्तवला होता. हवामान खात्याकडून शहराला यलो अलर्ट देखील देण्यात आला होता. त्यानुसार पुण्यातील विविध भागात पावसाच्या सरी कोसळल्या.

Rain In pune
Beed News: बीडकरांची चिंता वाढली! जिल्ह्यात झपाट्याने कमी होतोय पाणीसाठा; धरणात केवळ इतकाच पाणीसाठा

अवकाळी पावसामुळे फळभाज्यांची आवक घटली

पुण्यात याआधी देखील अवकाळी पावासाने हजेरी लावली आहे. या अवकाळी पावसामुळे पुणे जिल्ह्यात फळ भाज्यांच्या उत्पादनावर परिणाम झाला आहे. तर पुण्यातील छत्रपती शिवाजी मार्केटमध्ये फळभाज्यांची आवक घटल्याची निदर्शनास आले आहे. भाज्यांचे भाव मात्र स्थिर असल्याचे दिसून आले आहे.

अवकाळी पावसामुळे फळ भाज्यांचे दर मात्र 10 ते 20 टक्क्यांनी घटले आहेत. काल एका दिवसात मार्केट यार्डमध्ये 90 ट्रक फळभाज्यांची आवक होती. या आठवड्यात फळभाज्यांची आवक मोठ्या प्रमाणात घटणार आहे. जिल्ह्यात अवकाळी पाऊस झाल्याने फळभाज्याच्या उत्पादनावर मोठा परिणाम होण्याचीही शक्यता वर्तवण्यात येत आहे.

Rain In pune
Maharashtra Weather Update: शेतकऱ्यांनो काळजी घ्या! राज्यातील काही जिल्ह्यात अवकाळी पावसाची शक्यता; कधी, कुठे आणि केव्हा? वाचा

बारामतीतही पावसाची हजेरी

बारामती शहर आणि परिसरात सायंकाळी साडेपाच वाजता वादळी वाऱ्यासह पावसाने जोरदार हजेरी लावली. सकाळपासून वातावरणात कमालीचा ऊकाडा जाणवत होता. चांगला पाऊस पडल्याने हवेमध्ये गारवा निर्माण झाल्याने ऊकाड्याने हैरान झालेल्या नागरिकांना दिलासा मिळाला आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com