Rain Update Live : सिंधुदुर्गात उद्यापासून पुढील ३ दिवस रेड अलर्ट, NDRF पथक तैनात

राज्यात कालपासून मुसळधार पावसाने सुरुवात केली आहे.
Maharashtra Rain Updates
Maharashtra Rain Updates SAAM TV

सिंधुदुर्गात उद्यापासून पुढील ३ दिवस रेड अलर्ट, NDRF पथक तैनात

सिंधुदुर्गात उद्यापासून पुढील तीन दिवसांसाठी रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. त्यामुळे खबरदारी म्हणून एनडीआरएफचे २२ जणांचे पथक पुढील तीन दिवस जिल्ह्यात तैनात असणार आहे. नागरिकांनी खबरदारी घ्यावी आणि सतर्क राहावे अशा सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या आहेत.

उल्हास नदीने ओलांडली धोक्याची पातळी

कर्जत, वांगणी, बदलापूर, अंबरनाथमध्ये मुसळधार पाऊस कोसळत असून, उल्हास नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे. बदलापूर प्रशासन सतर्क झाले आहे.

वसई: तानसा नदीने गाठली धोक्याची पातळी

वसईतील पांढरतारा पूल गेला पाण्याखाली, १२ गावांचा संपर्क तुटला

अतिवृष्टीमुळं भोर-महाड मार्गावरील वरंधा घाटात रस्त्याला भेगा

अतिवृष्टीमुळे वरंधा घाटातील रस्त्यांना भेगा

अनेक ठिकाणी रस्ता खचला

भोर-महाड मार्गावर जोरदार पाऊस

भोर-महाड मार्गावरील वाहतूक बंद

फक्त स्थानिक गावकऱ्यांना फक्त प्रवेश

वर्ध्यातील आर्वी तालुक्यात अतिवृष्टी

Summary

आर्वी तालुक्यात १७४.४ मिमी पावसाची नोंद

देऊरवाडा गावातील ११० घरांत शिरले पावसाचे पाणी

खूबगाव येथील पोल्ट्री फार्ममधील १० हजार कोंबड्याचा मृत्यू

विदर्भात जोरदार पावसाची शक्यता, बगाजी सागर धरणाचे ७ दरवाजे उघडले

विदर्भात जोरदार पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. अमरावती आणि वर्धा जिल्ह्याच्या सीमेवर असलेल्या लोवर वर्धा प्रकल्पाच्या बगाजी सागर धरणात सद्या ७१.९६ टक्के जलसाठा आहे. या धरणाचे ७ दरवाजे उघडण्यात आले आहेत. यातून पाण्याचा विसर्ग केला जातो आहे. नदी पात्रात पाण्याचा विसर्ग होत असल्याने नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. याशिवाय नदीपात्रात कुणीही उतरू नये असे आवाहनही करण्यात आले आहे.

ठाण्यात मुंबई-नाशिक महामार्ग आणि घोडबंद रस्त्यावर वाहतूक कोंडी

ठाण्यात मुंबई-नाशिक महामार्ग आणि घोडबंदर रस्त्यावर प्रचंड वाहतूक कोंडी

पावसामुळे रस्त्यावर पडलेले खड्डे बुजवण्याचे काम काही ठिकाणी सुरू असल्याचा फटका

ठाणेकर आणि नाशिकच्या दिशेने जाणाऱ्या प्रवाशांना करावा लागतोय वाहतूक कोंडीचा सामना

गेल्या दीड ते दोन तासांपासून वाहतूक कोंडी

रायगड जिल्ह्यात दिवसभरात सरासरी १४१ मिमी पावसाची नोंद

रायगड जिल्ह्यात गेल्या २४ तासांत सरासरी १४१.०९ मिमी इतक्या पावसाची नोंद झाली आहे. तसेच १ जूनपासून आज अखेर एकूण सरासरी ८३७.७२ मिमी पावसाची नोंद झाली आहे.

अमरावतीत जिल्ह्यात पावसाची दमदार हजेरी, शेकडो हेक्टर शेती पाण्याखाली

अमरावती जिल्ह्यात पावसाने दमदार हजेरी लावली. शेतकऱ्यांना प्रचंड दिलासा मिळाला आहे, तर जिल्ह्याच्या काही भागात पावसाने दाणादाण उडवून दिली आहे. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांनावर तिबार पेरणीचे संकट उभे ठाकले आहे. अमरावती जिल्ह्यातील धामणगाव रेल्वे तालुक्यातील मंगरूळ दस्तगिर शेत शिवारात शेकडो हेक्टर शेतीत पावसाचे पाणी साचल्याने अनेक शेतकऱ्यांची शेती खरडून गेली आहे. शेताला नदीचं स्वरूप प्राप्त झाले आहे.

मुंबईत दोन दिवस ऑरेंज अलर्ट

मुंबईसाठी दोन दिवस ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलाय. सकाळपासून मुंबईत पावसाची संततधार सुरू आहे. त्यामुळे सखल भाग असलेल्या हिंदमाता परिसरात पावसाचं पाणी साचलं होतं.

पुण्यात पावसाला सुरुवात; घाट परिसरात मुसळधारची शक्यता

पुणे शहरात बुधवारी सकाळपासूनच हलक्या ते मध्यम सरीच्या पावसाने हजेरी लावली आहे. पुणे शहरात मंगळवारी रात्री पर्यंत २.८ मिमी इतका पाऊस झाला. शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या धरण क्षेत्रात देखील चांगला पाऊस झाला आहे. मंगळवारी रात्रीपर्यंत टेमघर ३० मिमी, पानशेत २१ मिमी, वरसगाव २० तर खडकवासला धरण क्षेत्रात १० मिमी इतका पाऊस झाला. येत्या ३ दिवसात पुण्यात मध्यम स्वरूपाचा पाऊस होईल अशी शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. दुसऱ्या बाजूला पुणे जिल्ह्यातील घाट परिसरात मुसळधार पावसाची शक्यता आहे.

यवतमाळमध्ये लिंगती येथील पर्यायी पूल गेला वाहून

झरी तालुक्यातील वणी- पाटण बोरी मार्गावरील लिंगती येथील पुलाचे काम गेल्या अनेक दिवसांपासून सुरू आहे. मात्र पुलाचे बांधकाम सुरू असल्यामुळे पर्यायी व्यवस्था म्हणून बाजूला मुरूम टाकून छोटा पुल बनवण्यात आला होता. मात्र झरी तालुक्यात मुसळधार पावसामुळे उभा केलेला पूल वाहून गेल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.

नेरूळ, तुर्भे परिसरात धुवाधार

नवी मुंबईमध्ये मुसळधार पावसाला सुरुवात झाली. नेरूळ, तुर्भे परिसरात धुंवाधार पाऊस सुरु आहे. रस्त्यावर अनेक ठिकाणी पाणी साचले आहे. पावसामुळे दृश्यमानता कमी झाल्याने वाहतूक संथ गतीने सुरु आहे.

नवी मुंबईत सलग तिसऱ्या दिवशी पावसाची संततधार सुरूच

नवी मुंबईत सलग तिसऱ्या दिवशी पावसाची संततधार सुरूच आहे. रात्री काही काळ विश्रांती मात्र सकाळपासून संततधार सुरू झाली. वाशी, कोपरखैरणे आणि नेरुळ विभागात चांगला पाऊस सुरु असून, आजही मुसळधार पावसाचा अंदाज वर्तविल्याने महापालिकेचे आपत्ती व्यवस्थापन सज्ज आहे.

सांगली जिल्ह्यात पुढील पाच दिवस मुसळधार पावसाची शक्यता

सांगली जिल्ह्यात पुढील पाच दिवस मुसळधार पावसाची अंदाज वर्तवला आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासन सज्ज झाले आहे. पावसाचा जोर वाढला तर कोणतीही जीवितहानी होऊ नये, यासाठी प्रशासनाने खबरदारी घ्यायला सुरुवात केली आहे. जिल्हा प्रशासनाच्या वतीने नदी पात्रात बोटींचे प्रात्यक्षिके घेत बोटींची सज्जता तपासण्यात आली. तसेच आपत्ती उद्भवल्यास तातडीच्या सर्व उपाययोजना राबविल्या जातील असे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

वसई, विरारमध्ये जोरदार पाऊस

वसई, विरार, नालासोपारा शहरात काल रात्रीपासून पडणाऱ्या पावसामुळे सखल भाग पाण्यात गेले आहेत. त्यामुळे लोकांचे मोठ्या प्रमाणात हाल होत आहेत. फक्त दोन दिवसाच्या पावसात वसई विरार शहर पाण्याखाली गेले आहे.

कोयना धरण क्षेत्रात पावसाचा जोर वाढला

सातारा जिल्ह्यच्या पश्चिम भागात पावसाने (Rain) चांगलाच जोर धरला आहे. तापोळा येथे तीन नद्यांचा संगम आहे. कोयना, सोळशी, कांदाटी या तिन्ही नद्या या ठिकाणी मिळतात या भागात पावसाचा जोर वाढल्यामुळे दरे, गाढवली आणि इतर गावातील लोकांना आता जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे.

कोयना धरण क्षेत्रात सुद्धा पावसाने जोर धरल्याने या भागातील कोयना धरणाच्या बॅक वॉटरमध्ये सद्या झपाट्याने वाढ होऊ लागली आहे.

कोल्हापूर जिल्ह्यात संततधार सुरुच; २८ बंधारे पाण्याखाली

कोल्हापूर जिल्ह्यात संततधार पाऊस सुरुच आहे. पंचगंगा नदीची पाणी पातळी वाढली आहे. राजाराम बंधाऱ्याजवळ ३० फूट पाणी आहे. जिल्ह्यातील २८ बंधारे पाण्याखाली गेले आहेत, तर राधानगरी धरणातून ११०० क्यूसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे.

गोंदिया जिल्ह्यातही अतिवृष्टी; जिल्हा प्रशासन अलर्टवर

गोंदिया जिल्ह्यातील तिरोडा, गोरेगाव आणि सडक-अर्जुनी परिसरात मुसळधार पाऊस (Rain) पडला आहे. जिल्ह्यात अतिवृष्टीची नोंद झाली आहे. गोंदिया जिल्ह्यात सर्वाधिक १५०.७ मिमी पावसाची नोंद झाली आहे. तिरोडा तालुक्यात १४० मिमी आणि गोरेगाव तालुक्यात १०६ व गोंदिया तालुक्यात ८१ .४ मिमी पावसाची नोंद झाली. पुढील दोन दिवस मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे, त्यामुळे गोंदिया जिल्हा प्रशासन अलर्टवर आहे.

मुंबईत ९ जुलैपर्यंत ऑरेंज अलर्ट; नद्यांच्या पाणी पातळीत वाढ

राज्यात काल (मंगळवार) पासून मुसळधार पावसाने (Rain) सुरुवात केली आहे. हवामान विभागाने मुंबईत ९ जुलैपर्यंत ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. देशातील सर्वच राज्यांत मान्सून सक्रीय झाला आहे. ५, ८ आणि ९ जुलै रोजी तेलंगणातील विविध भागात मुसळधार पावसाची शक्यता आहे. तर आज सकाळी मुंबईत पावसाने थोडी विश्रांती घेतली होती, पण नवी मुंबईत सकाळपासून पावसाने पुन्हा जोर धरला आहे.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV Marathi News | साम टीव्ही
saamtv.esakal.com