रायगड जिल्हयात पावसाचा लपंडाव सुरूच
रायगड जिल्हयात पावसाचा लपंडाव सुरूचराजेश भोस्तेकर

रायगड जिल्हयात पावसाचा लपंडाव सुरूच

रायगड जिल्ह्यात रात्रीपासून पाऊस पडत असून पहाटे पावसाने विश्रांती घेतली होती. मात्र पुन्हा पावसाने सुरुवात केली आहे. पाऊस हा थांबत थांबत पडत असल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे.

राजेश भोस्तेकर

रायगड - जिल्ह्यात रात्रीपासून पावसाच्या सरी पडत असून पहाटे पावसाने विश्रांती घेतली होती. मात्र जिल्ह्यात पुन्हा पावसाने सुरुवात केली आहे. पाऊस हा थांबत थांबत पडत असल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे. नद्याही तुंबडी भरून वाहत असल्यातरी त्यांनी धोक्याची पातळी ओलांडलेली नाही. सतत पडत असलेल्या पावसाने जिल्ह्यातील भात लावणीची कामे अंतिम टप्यात आली आहेत. या पावसामुळे जिल्हा प्रशासनाने सर्व यंत्रणांना सतर्क राहण्याचे आदेश दिले आहेत. Rains continue in Raigad district

हे देखील पहा -

जिल्ह्यात 11 जुलै पासून पावसाने सुरुवात केली आहे. आठ दिवसांपासून पावसाने जिल्ह्यात मुक्काम केला आहे. 12 आणि13 जुलै रोजी मुसळधार पावसाने काही भागात पूरस्थिती निर्माण झाली होती. गेल्या दोन दिवसांपासून जिल्ह्यात पावसाचा लपंडाव सुरू आहे. मध्येच सूर्यदर्शन होत आहे. तर काही वेळातच पावसाचे आगमन होत आहे. आज सकाळी थोडी पावसाने विश्रांती घेतली असली तरी अकरा वाजल्यापासून पुन्हा पावसाने सुरुवात केली आहे. यामुळे विजेचाही लपंडाव सुरू आहे.

Edited By - Akshay Baisane

Related Stories

No stories found.
Latest and Breaking News in Marathi | Live Marathi News Updates | live tv streaming in Marathi | Saam TV
www.saamtv.com