'सँडहर्स्ट रोड' रेल्वे स्थानकाजवळील पर्जन्य जलवाहिनीचे काम पूर्ण

रेल्वे ट्रॅकच्या खालून तब्बल ४१५ मीटर लांबीची आणि १,८०० मिलिमीटर व्यासाची पर्जन्य जलवाहिनी मध्यरेल्वेद्वारे टाकण्यात आली
'सँडहर्स्ट रोड' रेल्वे स्थानकाजवळील पर्जन्य जलवाहिनीचे काम पूर्ण
'सँडहर्स्ट रोड' रेल्वे स्थानकाजवळील पर्जन्य जलवाहिनीचे काम पूर्णsaam tv

मुंबई : बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या (Mumbai Municipal Corporation) आणि मध्य रेल्वेच्या (Central Railway) अभियंत्यांनी संयुक्तपणे केलेल्या कौशल्यपूर्ण अभियांत्रिकीय कामांमुळे यंदाच्या पावसाळ्यातील अतिवृष्टी दरम्यान सँडहर्स्ट रोड (Sandhurst Road) रेल्वे स्थानक परिसरात पाणी साचले नाही. यासाठी रेल्वे ट्रॅकच्या खालून तब्बल ४१५ मीटर लांबीची आणि १,८०० मिलिमीटर व्यासाची पर्जन्य जलवाहिनी (Water Duct) मध्यरेल्वेद्वारे टाकण्यात आली. तर ही पर्जन्यजल वाहिनी मुंबई महानगरपालिकेच्या मुख्य पर्जन्य जलवाहिनीला जोडण्यासाठी रेल्वे हद्दीच्या पुढील भागात २५ मीटर लांबीची एक अतिरिक्त 'बॉक्स ड्रेन' (Box Drain) महानगरपालिकेच्या वतीने टाकण्यात आल्याची माहिती अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (प्रकल्प) पी. वेलरासू यांनी दिली आहे.

'सँडहर्स्ट रोड' रेल्वे स्थानकाजवळील पर्जन्य जलवाहिनीचे काम पूर्ण
सात नवजात बालकांचा मृत्यू! रायपूरमधील घटना

अतिरिक्त आयुक्त पी. वेलरासू यांनी याबाबत माहिती दिली. बृहन्मुंबई महानगरपालिका व मध्य रेल्वे यांनी अत्यंत चांगला समन्वय साधून केवळ ४ महिन्यांच्या कालावधीत एकूण तब्बल ४४० मीटर लांबीच्या व दोन वेगवेगळ्या प्रकारच्या पर्जन्य जलवाहिन्या बांधण्याचे आव्हानात्मक काम पूर्ण केले आहे. या कामासाठीचा सर्व खर्च बृहन्मुंबई महानगरपालिकेने केला आहे, असे वेलरासू ह्यांनी नमूद केले.

मुंबईमध्ये उपनगरीय रेल्वे रुळांवरील पावसाळी पाणी साचण्याच्या ठिकाणी मायक्रो टनेलिंगचे काम रेल्वे हद्दीत रेल्वे प्रशासनाकडून केले जात आहे. त्यासाठी आवश्यक त्या त्या ठिकाणी बृहन्मुंबई महानगरपालिका देखील आपल्या हद्दीत काम करीत आहे. दक्षिण मुंबईतील सँडहर्स्ट रोड रेल्वे स्थानकानजीकच्या परिसरात दर वर्षी अतिवृष्टी दरम्यान पाणी साचून रेल्वे वाहतुकीला अडथळा निर्माण होत असे. या समस्येवर तोडगा काढण्यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या पर्जन्य जलवाहिन्या विभागाच्या अभियंत्यांनी व मध्य रेल्वेच्या अभियंत्यांनी संयुक्तपणे अभ्यास करून, फक्त नाल्यांवर अवलंबून न राहता, 'रेल्वे ट्रॅक'च्या खाली 'मायक्रो टनेलिंग' पद्धतीने रेल्वे हद्दीतील पर्जन्य जलवाहिनी तयार करण्याचा निर्णय घेतला. हे काम पूर्ण करताना वेगवेगळ्या आव्हानांवर यशस्वीपणे मात करण्यात आली, बृहन्मुंबई महानगरपालिका आणि रेल्वे प्रशासनाने त्यासाठी योग्य ताळमेळ ठेवला, असे वेलरासू ह्यांनी नमूद केले.

रेल्वे हद्दीतील पर्जन्य जलवाहिनीचे काम पूर्ण झाल्यानंतर, म्हणजे पाणी वाहून जाण्यासाठी नवीन मार्ग तयार झाल्यानंतर, खरी गरज होती ती महानगरपालिकेच्या मुख्य पर्जन्य जलवाहिनीला जोडणी करण्याची. कारण त्याशिवाय पाण्याचा निचरा होणे शक्यच नव्हते. त्यासाठी मुंबई पालिकेच्या हद्दीत २५ मीटर लांबीची 'बॉक्स ड्रेन' टाकून नवीन पर्जन्य जलवाहिनी महापालिकेच्या मुख्य पर्जन्य जलवाहिनीला जोडली. यामध्ये पी. डि'मेलो मार्गावर रेल्वे आयुक्त कार्यालय प्रवेशद्वारापासून मॅलेट बंदर जंक्शन पर्यंत सुमारे २५ मीटर अंतरात पर्जन्य जल वाहून नेण्यासाठी प्रारंभी रेल्वे प्रशासनाकडून १८०० मिमी व्यासाचा भूमिगत बोगदा (मायक्रो टनेलिंग) बांधण्यात येणार होता. त्यास बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल ह्यांनी मंजुरी दिल्यानंतर महानगरपालिकेच्या पर्जन्य जलवाहिन्या विभागाने हे काम हाती घेतले. पी डिमेलो मार्ग हा वाहतुकीच्या दृष्टीने महत्त्वाचा असल्याने वाहतूक विभागाची ना-हरकत प्राप्त करून दिनांक १५ एप्रिल २०२१ रोजी हे काम सुरू करण्यात आल्याचेही यावेळी वेलरासू यांनी सांगितले.

Edited By- Anuradha

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com