...तर महाराष्ट्र पेटल्याशिवाय राहणार नाही: बाळा नांदगावकर

धमकीच्या पत्राची माहिती गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांना दिली, असंही नांदगावकर म्हणाले.
...तर महाराष्ट्र पेटल्याशिवाय राहणार नाही: बाळा नांदगावकर
Bala Nandgaonkar Latest Marathi News, MNS NewsSaam Tv

मुंबई : मनसे (MNS) अध्यक्ष राज ठाकरे यांच्या केसाला धक्का लागल्यास महाराष्ट्र पेटल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी दिला. राज ठाकरेंना (Raj Thackeray) राज्य आणि केंद्र सरकारने संरक्षण द्यावे, अशी मागणीही नांदगावकर यांनी केली. भोंग्याविरोधात आम्ही आंदोलन केलं या संदर्भात मला धमकीचे पत्र आले आहे. या पत्रात राज ठाकरे यांचेही नाव आहे. हे पत्र मी काल राज ठाकरेंना दाखवले, आज गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांना दाखवले आहे. त्यामुळे राज ठाकरे यांना संरक्षण देण्याची मागणी आम्ही केली असल्याचे नांदगावकर म्हणाले. (Bala Nandgaonkar Latest Marathi News)

काल संध्याकाळी पोलीस आयुक्त संजय पांडे यांना भेटून ते पत्र दिले. हे पत्र माझ्या कार्यालयात आले, भोंगा प्रकरणावर हे पत्र आले आहे. हे पत्र हिंदी भाषत लिहिलेले आहे. गृहमंत्र्यांनी यावर कारवाई करणार असं म्हटले आहेत. असंही नांदगावकर म्हणाले. आम्ही राज ठाकरेंनी संरक्षण द्या म्हणून अनेक दिवसापासून मागणी करत आहे.

Bala Nandgaonkar Latest Marathi News, MNS News
राज ठाकरे इतकी भाबडी अपेक्षा ठेवतील वाटलं नव्हतं- देवेंद्र फडणवीस

भोंगा आंदोलन सामाजिक आहे, धार्मिक नाही. आम्ही आजही हे सर्वांना सांगत आहे. उत्तर प्रदेशच्या मुंबई कार्यालयावर बोलताना नांदगावकर म्हणाले, महाराष्ट्र नव निर्माण सेनेचे एक कार्यालय अयोध्येतही आहे.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी कालच (मंगळवारी) ट्विट करून मनसैनिकांवर होणाऱ्या पोलीस कारवाईबाबत नाराजी व्यक्त केली होती. कुणीही सत्तेचा ताम्रपट घेऊन आलेला नाही. उद्धव ठाकरे, तुम्हीही नाही, असं राज ठाकरेंनी या पत्रात नमूद करत थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली होती. त्यानंतर आता मनसैनिकांवर होणाऱ्या पोलीस कारवाया बंद करण्यासाठी अथवा काहिसा दिलासा मिळण्यासाठी बाळा नांदगावकर यांनी ही भेट घेतली आहे.

Bala Nandgaonkar Latest Marathi News, MNS News
MNS : बाळा नांदगावकरांनी घेतली गृहमंत्र्यांची भेट; मनसैनिकांवरील कारवाईबाबत चर्चा

४ मे ला मनसैनिकांची धरपकड

मशिदी समाेर अथवा शहरात हनुमान चालिसा (hanuman chalisa) लावण्यावरुन राज्यातील बहुतांश जिल्ह्यात मनसेचे (mns) कार्यकर्ते आणि पाेलीस दल (police) यांच्यात खटके उडाले होते. साेलापूर (solapur), धुळे (dhule), हिंगाेली (hingoli), पिंपरी चिंचवड (pimpri chinchwad) येथे पाेलीसांनी मनसे प्रमुख राज ठाकरे (raj thackeray) यांच्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले. त्याचप्रमाणे अनेक मनसैनिक सध्या भूमिगत आहेत.

Edited By- Santosh Kanmuse

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.