राज ठाकरेंनी शिवतीर्थावर बोलावली महत्वाची बैठक; भोंग्यांबाबत ठरू शकते भूमिका

Raj Thackeray Calls Meeting On Shivtirtha : या बैठकीनंतर राज ठाकरे आपली पुढील भूमिका जाहीर करणार आहेत.
राज ठाकरेंनी शिवतीर्थावर बोलावली महत्वाची बैठक; भोंग्यांबाबत ठरू शकते भूमिका
Raj Thackeray Calls Meeting On ShivtirthaSaam Tv

रुपाली बडवे

मुंबई: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज अक्षय्य तृतीयेच्या दिवशी निवडक पदाधिकाऱ्यांची बैठक बोलवली आहे. या भेटीत भोंगे (Loudspeaker), महाआरती आणि हनुमान चालीसा यावर चर्चा होण्याची शक्यता असून याबाबत पक्षाची नेमकी भूमिका काय असेल ते पदाधिकाऱ्यांपर्यंत पोहचवण्यासाठी ही बैठक (Meeting) बोलवण्यात आली असल्याचं सांगण्यात येत आहे. राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्या शिवतीर्थ या नव्या निवासस्थानी होणाऱ्या बैठकीला निवडक पदाधिकारी आणि नेते या उपस्थित असणार आहेत. या बैठकीनंतर राज ठाकरे आपली पुढील भूमिका जाहीर करणार आहेत. (Raj Thackeray Calls Meeting On Shivtirtha For Loudspeaker Issue)

हे देखील पाहा -

राज ठाकरे यांनी काल (सोमवारी) ट्विट करून आज (मंगळवारी) भूमिका जाहीर करणार असल्याच सांगितलं होतं. त्याचप्रमाणे आज अक्षय्यतृतीया आणि रमजान ईद हे दोन्ही सण एकाच दिवशी आले आहेत. अशात राज ठाकरेंच्या भोंग्यांबाबतच्या भूमिकेमुळे तणाव निर्माण होऊ नये म्हणून राज्यभरात पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त आहे. राज ठाकरेंनीही मनसैनिकांना आजच्या दिवशी कुठेही महाआरत्या न करण्याचं आवाहन केलंय. राज ठाकरे म्हणाले की, उद्या ईद आहे. मुस्लिम समाजाचा हा सण आनंदाने साजरा व्हावा. कुठेही महाआरत्या करु नका. कोणाच्याही सणात बाधा आणू नका. भोंग्यांच्या विषय हा सामाजिक नसून धार्मिक आहे. त्यामुळे याबाबत माझी पुढची भूमिका मी उद्या (३ मे) ला ट्विटरवर जाहिर करेन असं राज ठाकरे म्हणाले होते.

Edited By - Akshay Baisane

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.