देशाला राज ठाकरेंसारख्या लोकांची गरज; कांचन गिरी यांच वक्तव्य (पाहा व्हिडीओ)

'हिंदुस्थान धोक्यात आहे अफगाणिस्तान ची परिस्थिती काय झाली पहा'
देशाला राज ठाकरें सारख्यां लोकांची गरज; कांचन गिरी यांच वक्तव्य (पाहा व्हिडीओ)
देशाला राज ठाकरें सारख्यां लोकांची गरज; कांचन गिरी यांच वक्तव्य (पाहा व्हिडीओ)वैदेही काणेकर

मुंबई : जुना आखाड्याच्या प्रमुख कांचन गिरी गुरू माँ (Kanchan Giri Guru Maa) यांनी आज कृष्णकुंज (Krishnakunj) वरती राज ठाकरेंची (Raj Thackeray) भेट घेतली त्यांनी राज ठाकरेंनी भेट घेण्याआधी त्यांनी बाळासाहेब ठाकरेंच्या (Balasaheb Thackeray) स्मृतीस्थळावरती जाऊन अभिवादन केलं. राज यांची भेट घेतल्यानंतर त्यांनी पत्रकार परिषद घेतली. त्यावेळी त्यांनी हिंदुत्वाचा अजेंडा आहे की भारत देश हिंदूराष्ट्र म्हणून ओळखला पाहिजे असं त्यांनी स्पष्ट केलं. तसेच राज ठाकरे हे जे बोलतात तेच करतात आणि अशा लोकांचीच या देशाला गरज असल्याचही त्या म्हणाल्या. (Raj Thackeray does what he says, says Kanchan Giri)

पाहा व्हिडीओ -

उत्तर भारतीयांबाबत आजपर्यंत जे गोंधळाच वातावरण होत पण असा कोणताच भेदभाव नव्हता त्यांच विधान चुकीच घेतलं अस कांचन गिरी म्हणाल्या. जर उत्तर भारतीय लोक गावी राहिले तर त्यांना देखील रोजगार मिळेल उत्तर भारतीय महाराष्ट्रा इतकंच राज यांना प्रिय असल्याचं वक्तव्यं देखील कांजन गिरीयांनी केलं आहे.

राज ठाकरे डिसेंबर मध्य़े अयोध्येला

बाळासाहेबांना मी भेटले असल्याचही त्यांनी यावेळी सांगितलं. राज ठाकरे डिसेंबर मध्य़े अयोध्येला जायचा विचार करत असल्याचही त्या म्हणाल्या. राज हे जे बोलतात तेच करतात आगामी निवडणुकीत उत्तर प्रदेशातील लोकांनी त्यांना पाठिंबा दिला पाहिजे. यूपी, बिहार बाबत त्यांच्या मनात चांगले भाव आहेत. हिंदुत्वाचा विचार करणाऱ्यांना निवडणुकीबाबत काही विशेष नसतं मुद्दा फक्त कायम ठेवला पाहिजे खुर्चीसाठी बदलला नाही पाहिजे असंही कांचन गुरु म्हणाल्या.

देशाला राज ठाकरें सारख्यां लोकांची गरज; कांचन गिरी यांच वक्तव्य (पाहा व्हिडीओ)
NCB ची कौतुकास्पद कामगिरी; वर्षभरात केलं इतक्या कोटींचं ड्रग्ज जप्त !

तसेच आमची विचार राज यांच्याशी मिळतात हिंदू राष्ट्र साठी जे लोक काम करत आहेत त्यांना आमचा पाठिंबा राज यांनी त्यांना भाजपची विचारधारा पटली तर त्यांनी भाजप मध्ये जावं असही त्या म्हणाल्या. भाजपची विचारधारा हिंदुत्वाशी नसती तर राम मंदिर कसं बनलं? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. राज अयोध्याला आले तर संत समाजाकडून भव्य स्वागत केलं जाणार असल्याचही त्या म्हणाल्या.

नेहरू, गांधींमुळे काश्मीर समस्या

हिंदुस्थान धोक्यात आहे अफगाणिस्तान ची परिस्थिती काय झाली पहा पुढील 10 वर्षात भारतीयांना शरणार्थी होण्याची भीती आहे . काश्मीर खूप काळापासून जळत आहे नेहरु आणि गांधी (Neharu Gandhi) यांनी जर काश्मीर (Kashmir) विभक्त तर आज काश्मिरची ही परिस्थिती झाली नसती असं वक्तव्यं देखील त्यांनी यावेळी केलं आहे.

Edited By - Jagdish Patil

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com