शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांचे राज ठाकरेंनी घेतले अंत्यदर्शन

शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरेंवर मागील आठवड्यापासून दिनानाथ मंगेशकर रुग्णालयात उपचार सुरु होते
शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांचे राज ठाकरेंनी घेतले अंत्यदर्शन
शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांचे राज ठाकरेंनी घेतले अंत्यदर्शनSaam Tv

पुणे : शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरेंवर मागील आठवड्यापासून दिनानाथ मंगेशकर रुग्णालयात उपचार सुरु होते. मात्र, उपाचारदरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली आहे. बाबासाहेब पुरंदरे हे चालता बोलता इतिहास होते. सोमवारी पहाटे ५ वाजून ७ मिनिटांनी त्यांनी अखेरचा श्वास घेतला आहे. बाबासाहेब पुरंदरे यांचे पार्थिव पर्वती या ठिकाणी असलेल्या निवास स्थानी आणले असून नागरिकांची अंत्यदर्शनाकरिता गर्दी होत आहे. पर्वती पायथा निवासस्थानी ८ ते १२ वाजेपर्यंत अंत्यदर्शनाकरिता ठेवण्यात येणार आहे. त्यानंतर १२ वाजता वैकुंठ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

हे देखील पहा-

बाबासाहेब पुरंदरेंचे पार्थिव त्यांच्या निवासस्थानी आणले आहे. पुरंदरेवाड्यात अंत्यदर्शनाकरिता ठेवण्यात आले आहे. शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्याच्या सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले आहेत. बाबासाहेब पुरंदरेंचे निधन झाल्याची बातमी कळताच मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे पुण्याकडे येण्याकरिता रवाना झाले होते.

शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांचे राज ठाकरेंनी घेतले अंत्यदर्शन
केरळमध्ये पावसाचे थैमान, 3 जिल्ह्यांत रेड अलर्ट

ते पुण्यात पुरंदरेवाड्यात पोहोचले आहेत. राज ठाकरे यांनी बाबासाहेब पुरंदरेंच्या पार्थिवाला पुष्पहार घालून अंत्यदर्शन घेतले आहे. खासदार सुप्रिया सुळे यांनीही शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांचे अंतिम दर्शन घेतले आहे. बाबासाहेबांच्या जाण्याने मोठी पोकळी निर्माण झाली आहे. त्यांच्या आठवणी, काम, लिखाण, साहित्य अनेक पिढ्यांसाठी जिवंत राहिल अशा भावना सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केले आहे.

Edited By- Digambar Jadhav

Related Stories

No stories found.
Latest and Breaking News in Marathi | Live Marathi News Updates | live tv streaming in Marathi | Saam TV
www.saamtv.com