तुम्ही लवकर बऱ्या व्हा, बाकीच आम्ही बघतो; राज ठाकरेंचा कल्पिता पिंपळेना शब्द

फेरेवाले जास्त मस्तवाल होत आहेत, जे घडल त्याच दु:ख आहे शिवाय असं धाडस करणाऱ्यांची हिम्मत ठेचायला हवी त्यांच्यावरती फक्त 'कारवाई करतो असं म्हणून आणि निषेध करुन काहीही होणार नाही'
तुम्ही लवकर बऱ्या व्हा, बाकीच आम्ही बघतो; राज ठाकरेंचा कल्पिता पिंपळेना शब्द!
तुम्ही लवकर बऱ्या व्हा, बाकीच आम्ही बघतो; राज ठाकरेंचा कल्पिता पिंपळेना शब्द!वैदेही काणेकर

ठाणे : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे MNS अध्यक्ष राज ठाकरे Raj Thackeray यांनी आज ठाण्यात ज्युपिटर रुग्णालयात जाऊन फेरीवाल्याच्या भ्याड हल्ल्यात जखमी झालेल्या ठाणे महापालिकेच्या महिला अधिकारी सौ.कल्पिता पिंपळे Kalpita Pimpale यांची भेट घेऊन त्यांच्या तब्येतीची चौकशी केली. तसेच 'तुम्ही लवकर बऱ्या व्हा, बाकीच आम्ही बघतो' असा शब्दही दिला आहे. Raj Thackeray met Kalpita Pimple, a woman officer of Thane Municipal Corporation

हे देखील पहा-

ठाणे महापालिकेतीलThane Municipal Corporation माजिवडा-मानपाडा प्रभाग समितीच्या हद्दीतील कासारवडवली नाक्यावरील अनधिकृत फेरीवाल्यांवर कारवाईसाठी पालिकेच्या अतिरिक्त आयुक्त कल्पिता पिंपळे गेल्या होत्या. ही कारवाई सुरु असताना अमरजित यादव Amarjit Yadav या फेरीवाल्याने अधिकारी पिंपळेंवरती कोयत्याने हल्ला केला होता या हल्ल्यामध्ये कल्पिता पिंपळे यांची दोन बोटे तुटली तसेच त्यांच्या अंगरक्षकाचेही एक बोट तुटले होते दरम्यान पिंपळे यांना उपचारांसाठी ज्युपिटर रुग्णालयातJupiter Hospital दाखल करण्यात आले होते. आज मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी अधिकारी कल्पिटा पिंपळेंच्या तब्यतीची चौकशीसाठी ते ज्युपिटर रुग्णालयात आले होते.

पोलिसांच्या तावडीतून सुटला की आम्ही त्याला ठोकणार

तसेच फेरेवाले जास्त मस्तवाल होत आहेत, जे घडल त्याच दु:ख आहे शिवाय असं धाडस करणाऱ्यांची हिम्मत ठेचायला हवी त्यांच्यावरती फक्त 'कारवाई करतो असं म्हणून आणि निषेध करुन काहीही होणार नाही' त्यांना त्यांच्याच भाषेत उत्तर द्यायला हवं तसंच तो पोलिसांच्या तावडीतून सुटला की आम्ही त्याला ठोकणार असा इशाराही राज ठाकरें यांनी त्यांच्या कालच्या पत्रकार परिषदेमध्ये दिला होता.

तुम्ही लवकर बऱ्या व्हा, बाकीच आम्ही बघतो; राज ठाकरेंचा कल्पिता पिंपळेना शब्द!
Delhi School : शाळकरी मुलांची सुट्टी संपली; दिल्लीतील शाळा आजपासून सुरु

तसेच पोलिसांनी त्यांची कारवाई केली आहे, न्यायलय ही योग्य न्याय देईल अशी अपेक्षा आहे असही राज ठाकरे म्हणाले दरम्यान आजच्या रुग्णालयातील भेटीवेळी मनसे नेते अमितAmit Tahckeray ठाकरे, बाळा नांदगावकर,Bala Nandgaonkarनितीन सरदेसाई,आणि जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव हे राज ठाकरेंसोबत होते.

Edited By - Jagdish Patil

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com