...तोपर्यंत हनुमान चालीसा सुरुच राहणार; राज ठाकरेंचा राज्य सरकारला पुन्हा इशारा

१३५ मशिदींवर कारवाई करण्यापेक्षा मनसेच्या कार्यकर्त्यांवर कारवाई का? असा सावलही राज ठाकरे यांनी केला.
...तोपर्यंत हनुमान चालीसा सुरुच राहणार; राज ठाकरेंचा राज्य सरकारला पुन्हा इशारा
Raj Thackeray SAAM TV

मुंबई: जोपर्यंत भोंगे चालू राहणार तोपर्यंत आमचे आंदोलन चालूच राहणार, अनधिकृत भोंगे वाजले तर तिथे हनुमान चालीसा वाजणार, असा इशारा मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राज्य सरकारला दिला. १३५ मशिदींवर कारवाई करण्यापेक्षा मनसेच्या कार्यकर्त्यांवर कारवाई का? असा सवालही राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी केला. आज राज ठाकरे यांनी भोंग्याच्या आंदोलनावर पत्रकार परिषद घेऊन माहिती दिली. (Raj Thackeray Press Conference On Loudspeaker)

'परवानगी घेऊन कोर्टाने दिलेल्या निर्णयानुसार ४५ डेसीबलपर्यंत भोंगे वाजवू शकता. काल पोलीस अधिकारी विश्वास नांगरे पाटील सांगत होते काही भोंग्यांना परवागनी दिली आहे. पण ही परवानगी ३६५ दिवसांसाठी का दिली. मग आम्हाला हनुमान चालिसासाठी परवानगी का दिली जात नाही, असा सवालही राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी केला.

Raj Thackeray
Raju Shetty on Thackeray | तर रोज सहा तास हनुमान चालीसा पठण करू !;राजू शेट्टींचा ठाकरेंना टोला

जे कायद्याचे पालन करत आहेत त्यांच्यावर तुम्ही कारवाई करणार, आणि जे पालन करत नाहीत त्यांच्यावर कारवाई होतं नाही, असं होत आहे. ज्या मशिदींनी आज अजान भोंग्यावर वाजवली नाही त्यांचे आभार मानतो, असंही राज ठाकरे म्हणाले. १३५ मशिदींवरती पोलीस कारवाई करणार आहेत का, असा सवालही राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी पोलिसांना केला.

मशिदींवरील भोंग्याचा मुद्दा हो धार्मिक नसून सामाजिक आहे. हा विषय फक्त मशिदींवरील भोंग्याचा नाही तर मंदिरावरील भोंग्याचा आहे. मंदिरावरील भोंगेही खाली आले पाहिजे, असंही राज ठाकरे म्हणाले. आजचे आंदोलन फक्त सकाळच्या अजानासाठी नाही दिवसभर असलेल्या अजानासाठी आहे. पुन्हा अजान वाजली तर आम्ही हनुमान चालीसा वाजवणार, असा इशाराही राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी दिला. Raj Thackeray Press Conference On Loudspeaker

अनधिकृत भोंगे खाली उरवले पाहिजेत, हे आंदोलन असेच चालू राहणार आहे. हा विषय फक्त आज एका दिवसाचा नाही. पुन्हा भोंगे वाजले तर हनुमान चालीसा चालूच राहणार. शांतता बिघडावी अशी आमची अजिबात इच्छा नाही. सरकारने ही गोष्ट ऐकावी, असंही राज ठाकरे (Raj Thackeray) म्हणाले.

Edited By- Santosh Kanmuse

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.