राज ठाकरे पुण्यात, वसंत मोरे कुठे? मोरेंची फेसबूक पोस्ट व्हायरल

राज ठाकरे कालपासून पुणे दौऱ्यावर होते. आज ते वढू येथे छत्रपती संभाजी महाराजांच्या समाधीचे दर्शन घेऊन औरंगाबादकडे रवाना झाले आहेत.
Vasant More
Vasant MoreSaam TV

पुणे: राज ठाकरे कालपासून पुणे दौऱ्यावर होते. आज ते वढू येथे छत्रपती संभाजी महाराजांच्या समाधीचे दर्शन घेऊन औरंगाबादकडे रवाना झाले आहेत. उद्या त्यांची औरंगाबादमध्ये सभा आहे. आगामी महापालिका निवडणूकांसाठी राज ठाकरे यांची मोर्चे बांधणी सुरु आहे. राज ठाकरे पुण्यामध्ये असताना वसंत मोरेंची गैरहजेरी हा चर्चेचा विषय ठरला आहे. मशिदीवरील भोंग्यांच्या मुद्द्यावरुन चर्चेत आलेले पुणे मनसेचे माजी शहराध्यक्ष वसंत मोरे (Vasant More) कालपासून कुठेही दिसले नाही.

आता वसंत मोरेंची फेसबूक पोस्ट (Vasant More Facebook Post) समोर आली आहे. राज ठाकरे (Raj Thackeray) पुण्यामध्ये असताना वसंत मोरे तिकडे इफ्तार पार्टीमध्ये असल्याचे दिसत आहे. एकाबाजूला राज ठाकरे मशिदीवरील भोंग्याबाबत कठोर भूमिका घेत असताना वसंत मोरे मात्र मुस्लीम समाजामध्ये रमताना पाहायले मिळाले आहे.

खरंतर या मुद्द्यावरुन स्वतंत्र भूमिका घेतल्यामुळे त्यांना शहराध्यक्ष पदावरून पायउतार व्हावं लागलं होते. मात्र अद्याप पक्षात असूनही ते या सर्व गोष्टींपासून नामानिराळे आहेत. मनसेच्या इतक्या मोठ्या कार्यक्रमात वसंत मोरेंची अनुपस्थिती आता चर्चेचा विषय ठरत आहे. याबाबात माहिती देताना शहराध्यक्ष साईनाथ बाबर (Sainath Babar) म्हणाले ते थेट औरंगाबादच्या सभेला उपस्थीत राहणार आहेत. आता पुण्यात ते का उपस्थीत नाहीत हे माहित नसल्याचं साईनाथ बाबर म्हणाले होते.

दरम्यान राज ठाकरेंनी गुढीपाडव्याच्या सभेत मशिदीवरील भोंग्याबाबत कडक भूमिका घेतली आणि राज्यातील राजकीय वातावरण तापले. पुण्यातील मनसेते नेते वसंत मोरे यांनी राज ठाकरेंच्या वक्तव्यावर नाराजी व्यक्त केली. त्यानंतर राज ठाकरेंच्या भूमिकेला माझं समर्थन नाही असे वसंत मोरे म्हणाले. त्यानंतर राज ठाकरेंनी वसंत मोरे यांना शहराध्यक्ष पदावरुन हटवले. परंतु आपण पक्षातच राहणार असल्याचे वसंत मोरे म्हणाले.

Vasant More
''संजय राऊतांनी मेधा सोमय्यांचे चारित्र्य हनन केले, माफी मागावी अन्यथा...''

राज ठाकरेंच्या ठाण्यातील उत्तरसभेमध्येही राज ठाकरे आपल्या भोंग्याच्या भूमिकेवर ठाम राहिले आणि राज्य सरकारला ३ तारखेपर्यंत अल्टीमेटम दिला. मशिवरील भोंगे खाली उतरवा नाहीतर त्यासमोर दुप्पट आवाजात हनुमान चालीसा लावा असे आदेश राज ठाकरे यांनी मनसैनिकांना दिले आहेत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com