पुण्यातील 'तळजाई' साठी राज ठाकरे सरसावले, 24 ऑक्टोबर रोजी आंदोलन

सकाळी 7 वाजता या आंदोलनाला सुरुवात होणार
पुण्यातील 'तळजाई' साठी राज ठाकरे सरसावले, 24 ऑक्टोबर रोजी आंदोलन
पुण्यातील 'तळजाई' साठी राज ठाकरे सरसावले, 24 ऑक्टोबर रोजी आंदोलनSaam Tv

पुणे - पुण्यात गेल्या काही महिन्यांपासून महापालिकेच्या निवडणुकीसाठी मोर्चेबांधणी करणारे मनसे अध्यक्ष राज ठाकरे Raj Thackeray थेट पुण्यातच आंदोलन करणार आहेत. तळजाई टेकडीवरील प्रकल्पाला विरोध करण्यासाठी राज ठाकरे यांच्या नेतृत्वात २४ ऑक्टोबर २०२१ रोजी पुण्यात आंदोलन करण्यात येणार आहे. आता या आंदोलनाकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागलेले आहे. या आंदोलनाबाबद मनसे शहर अध्यक्ष वसंत मोरे यांनी माहिती दिली.

हे देखील पहा -

तळजाई टेकडीवरील सुमारे 107 एकर जागेवर नियोजित जैवविविधता वसुंधरा प्रकल्पाचा विस्तृत प्रकल्प आराखडा पुणे महापालिका प्रशासनाने स्थायी समितीकडे मंजुरीसाठी सादर केला आहे. या प्रकल्पामुळे परिसरातील मूळ जैवविविधता नष्ट होण्याची भीती नागरिकांकडून व्यक्त करण्यात येत आहेत. त्यामुळे हा प्रकल्पच रद्द करण्यासाठी नागरिकांनी ‘तळजाई बचाव अभियान’ सुरू केले असून याची दखल मनसेनेही घेतली आहे.

पुण्यातील 'तळजाई' साठी राज ठाकरे सरसावले, 24 ऑक्टोबर रोजी आंदोलन
धुळ्यात ब्राऊन शुगर सापडल्याने खळबळ; आय जी पथक आणि मोहाडी पोलिसांची कारवाई

तळजाई टेकडीवर प्रकल्प होत असून या टेकडीवर एक प्रकारचे अतिक्रमणच केले जाणार आहे. त्याला आमचा विरोध आहे. त्यासाठी आम्ही आंदोलन करणार आहोत. मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या नेतृत्वात येत्या २४ ऑक्टोबर २०२१ रोजी हे आंदोलन होणार आहे. सकाळी 7 वाजता या आंदोलनाला सुरुवात होणार असल्याची माहिती देखील यावेळी वसंत मोरे यांनी दिली.

Edited By - Shivani Tichkule

Related Stories

No stories found.