जुन्या बालेकिल्ल्यांत मनसेचे इंजिन धावणार?

जुन्या, नव्या कार्यकर्त्यांना एकत्र आणून, संघटनेची बांधणी करून जुन्या बालेकिल्ल्यांत म्हणजे, पुणे, नाशिकमध्ये पुन्हा शिरकाव करण्याच्या इराद्याने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे मैदानात उतरले आहेत
जुन्या बालेकिल्ल्यांत मनसेचे इंजिन धावणार?
राज ठाकरे- Saam TV

मुंबई : जुन्या, नव्या कार्यकर्त्यांना एकत्र आणून, संघटनेची बांधणी करून जुन्या बालेकिल्ल्यांत म्हणजे, पुणे Pune, नाशिकमध्ये Nashik पुन्हा शिरकाव करण्याच्या इराद्याने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे MNS अध्यक्ष राज ठाकरे Raj Thackeray मैदानात उतरले आहेत. राजकीय बस्तान बसविण्याच्या हेतुने भाजपशी हातमिळवणी करण्याच्या दृष्टिनेही राज ठाकरे कार्यकर्त्यांशी चर्चा करणार आहेत. Raj Thackeray trying to strengthen MNS in Pune Nashik

याआधीच्या निवडणुकांत भाजपचे BJP फारसे वर्चस्व नसल्याने आता विस्तारलेल्या भाजपचा कितपत फायदा होईल, हे हिशेबी राजकारण पाहूनच मनसेची वाटचाल राहणार आहे. आगामी महापालिका, अन्य निवडणुकांसाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरे तयारीला लागले आहेत. मुंबई, नवी मुंबई, ठाणे, कल्याण-डोंबिवलीसह पक्ष स्थापनेच्या काळात वर्चस्व मिळविलेल्या नाशिक आणि पुणे शहरांकडे राज यांनी आपला मोर्चा वळविला असून, नाशिकमधील आढाव्यानंतर ते सोमवारपासून (आज ता. १९) पुण्यात सलग तीन दिवस तेही विभागानुसार पदाधिकारी कार्यकर्त्यांच्या बैठका घेणार आहेत. त्यामुळे राज यांच्या दौऱ्याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे.

हे देखिल पहा

मनसेचा भाजपशी घरोबा?

लोकसभेच्या २०१९ च्या निवडणुकीत भाजपविरोधात रान उठवणारे राज गेल्या काही दिवसांपासून शांत राहिले. याच काळात भाजप-शिवसेनेतील अंतर वाढल्याने मनसे आणि भाजप एकत्र येण्याच्या चर्चा वाढली. या नव्या समीकरणावरून भाजप, मनसे उघडपणे बोलत नसले तरी, योग्यवेळी पाहू, असे सूचक उत्तर देत आहेत. मनसेची राजकीय स्थिती पाहता, निवडणुकांत स्वबळाऐवजी अन्य कोणाला तरी सोबत घ्यावेच लागणार असल्याचे दिसत आहे. त्यामुळेच ते भाजपशी घरोबा करण्याची शक्यता दाट आहे. Raj Thackeray trying to strengthen MNS in Pune Nashik

राज ठाकरे
बैलांच्या बेकायदा शर्यतीवर पोलिसांची धडक कारवाई

मनसेने महापालिका निवडणुका लढण्याची तयारी सुरू केली आहे. लोक, कार्यकर्त्यांशी संवाद ठेवूनच पक्षाची वाटचाल करीत आहे. त्यामुळे पक्षाची ताकद आहे. निवडणुकीत मित्र कोण असेल, यापेक्षा निवडणुका लढवित आहोत, हा विचार महत्वाचा आहे, असे मनसेचे सरचिटणीस किशोर शिंदे यांनी सांगितले.

Edited By - Amit Golwalkar

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com