शरद पवारांनी दिलेल्या 'त्या' सल्ल्याचं राज ठाकरेंनी दिलं 'पान क्र.' सहित उत्तर

''राज ठाकरे यांनी आपले आजोबा प्रबोधनकार ठाकरे यांचे लिखाण वाचावे. त्यांचे लिखाण नक्कीच योग्य रस्ता दाखवेल.'' असा सल्ला शरद पवारांनी राज ठाकरेंना दिला होता.
शरद पवारांनी दिलेल्या 'त्या' सल्ल्याचं राज ठाकरेंनी दिलं 'पान क्र.' सहित उत्तर
शरद पवारांनी दिलेल्या 'त्या' सल्ल्याचं राज ठाकरेंनी दिलं 'पान क्र.' सहित उत्तरSaam Tv News

मुंबई : ''राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या जन्मानंतर महाराष्ट्रात जातीयवाद वाढला'' असं वक्तव्य राज ठाकरेंनी केलं होतं. राज ठाकरेंच्या या वक्तव्यावर यावर प्रतिक्रिया देताना शरद पवारांनी राज ठाकरेंना प्रबोधनकार ठाकरे यांचं लिखाण वाचण्याचा सल्ला दिला होता. याबाबत राज ठाकरेंनी शरद ट्विट करत शरद पवारांवर नाव न घेता निशाणा साधला आहे. (raj thackeray tweet quote of prabodhankar thackeray's book to criticize sharad pawar)

हे देखील पहा -

''राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या जन्मानंतर महाराष्ट्रात जातीयवाद वाढला'' असं वक्तव्य राज ठाकरेंनी काही दिवसांपुर्वी केलं होत. त्यानंतर ''राज ठाकरे यांनी आपले आजोबा प्रबोधनकार ठाकरे यांचे लिखाण वाचावे. त्यांचे लिखाण नक्कीच योग्य रस्ता दाखवेल.'' असा सल्ला शरद पवारांनी राज ठाकरेंना दिला होता. त्यानंतर राज ठाकरे एका पत्रकार परिषदेमध्ये म्हणाले होते की, ''मी प्रबोधनकार ठाकरेही वाचलेत, आणि यशवंतराव चव्हाणही. मी जे बोललो त्याचा माझ्या आजोबांच्या पुस्तकांशी काय संबंध होता हे मला पवार साहेबांनी समजावून सांगावं.'' असं राज ठाकरे म्हणाले होते. आता राज ठाकरेंनी प्रबोधनकार ठाकरे यांच्या ''माझी जीवनगाथा'' या पुस्तकातील एक प्रसिद्ध वाक्य ट्विट करत शरद पवारांवर अप्रत्यक्ष निशाणा साधला आहे.

शरद पवारांनी दिलेल्या 'त्या' सल्ल्याचं राज ठाकरेंनी दिलं 'पान क्र.' सहित उत्तर
मंदिरं खुली करण्यासाठी भाजपाच्या अध्यात्म आघाडीकडून सरकार विरोधात निदर्शनं

प्रबोधनकार ठाकरेंच्या माझी जीवनगाथा या पुस्तकातील ते वाक्य असे आहे की, "जिथे चिकित्सा-स्वातंत्र्य नाही, तिथे बौध्दिक विकास नाही... जिथे बौध्दिक विकासाला बंदी, तिथे राज्यकर्त्यांनी समाज-विकासावर मोठमोठी व्याख्याने देणे, म्हणजे बांडगुळानेच झाडाचं रक्त शोषणं होय!" : प्रबोधनकार ठाकरे 'माझी जीवनगाथा' (पाने २८०-२८१) असं ट्विट राज ठाकरेंनी केलं आहे. या ट्विटमधून त्यांनी शरद पवारांना अप्रत्यक्ष टोला लगावल्याचे दिसतेय. त्यामुळे राष्ट्रवादीकडून यावर काय प्रतिक्रिया येईल हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

Edited By - Akshay Baisane

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com