राज ठाकरेंच्या मनसेला मंत्रिमंडळातही स्थान नाही? दिल्लीत चर्चा; सुत्रांची माहिती

एकीकडे राज्यसभा, विधानपरिषद निवडणुकांमध्ये भाजपला मदत करणाऱ्या मनसेला (MNS) मंत्रीमंडळात स्थान मिळणार असल्याच्या चर्चा सुरु आहेत.
राज ठाकरेंच्या मनसेला मंत्रिमंडळातही स्थान नाही? दिल्लीत चर्चा; सुत्रांची माहिती

रुपाली बडवे -

मुंबई : राज ठाकरेंच्या (Raj Thackeray) मनसेला मंत्रिमंडळातही स्थान मिळणार नाही ? अशा प्रकारच्या चर्चा रात्री १२ वाजता महाराष्ट्र सदन दिल्ली येथे झाल्याची माहीती विश्वसनीय सुत्रांकडुन मिळत आहे.

राज्यात सत्तांतर होऊन चार आठवडे उलटले असले तरी अद्याप मंत्रिमंडळाचा विस्तार झालेला नाही. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) हे दोघेच सर्व खात्यांचा कारभार पाहात आहेत. एकीकडे राज्यातील मंत्रिमंडळाचा विस्तार झाला नाही म्हणून विरोधकांकडून सरकारवर टीका केली जात आहे.

पाहा व्हिडीओ -

तर दुसरीकडे राज्यसभा, विधानपरिषद निवडणुकांपासून भाजपला मदत करणाऱ्या मनसेला (MNS) मंत्रीमंडळात स्थान मिळणार असल्याच्या चर्चा सुरु आहेत. अशातच आता मनसेला मंत्रिमंडळातही स्थान मिळणार नाही ? अशा प्रकारच्या गप्पा रात्री १२ वाजता महाराष्ट्र सदन दिल्ली येथे झाल्याची सुत्रांकडुन माहीती मिळाली आहे.

राज ठाकरेंच्या मनसेला मंत्रिमंडळातही स्थान नाही? दिल्लीत चर्चा; सुत्रांची माहिती
'काही लोकांकडून जाणून बुजून आरक्षण...'; छगन भुजबळ यांचा गंभीर आरोप

सुत्रांच्या माहितीनुसार, शिवसेना नेत्या दीपाली सय्यद (Deepali Syyed) आणि केंद्रीय मंत्री रामदास आठवले (Ramdas Athawale) यांच्यात रात्री उशिरापर्यंत महाराष्ट्र सदनात चर्चा झाली. राज ठाकरेंच्या मनसेला मंत्रिमंडळातही स्थान मिळणार नाही ? अशा प्रकारच्या चर्चा त्यांच्यात झाल्याची माहिती समोर येत असून राज्यातील शिंदे-फडणवीस सरकार (Shinde-Fadnavis Government) आणि सद्यस्थितीत बाबतही चर्चा झाल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. त्यामुळे आता सतत भाजपधार्जिनी भूमिका घेणाऱ्या मनसेला सत्तांतराचा लाभ होणार की नाही याकडे सर्वांच लक्ष लागून राहिलं आहे.

Edited By - Jagdish Patil

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com