चलो अयोध्या! औरंगाबादच्या सभेनंतर अयोध्येत 'राज'गर्जना; मनसैनिक लागले कामाला

Raj Thackeray's Upcoming Ayodhya Visit Banner In Mumbai : कालची सभा गाजवल्यानंतर आता राज ठाकरे हे उत्तर प्रदेशातील अयोध्येत जाणार आहे.
चलो अयोध्या! औरंगाबादच्या सभेनंतर अयोध्येत 'राज'गर्जना; मनसैनिक लागले कामाला
Raj Thackeray's Upcoming Ayodhya Visit Banner In MumbaiTwitter/ @ANI

मुंबई: मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची रविवारी औंरंगाबादेत सभा झाली. या सभेनंतर आता राज ठाकरे हे अयोध्या दौरा करणार आहेत. या दौऱ्यासाठीचे बॅनर्स (Banners) मुंबईत झळकायल सुरुवात झाली आहे. राज ठाकरेंच्या (Raj Thackeray) अयोध्या दौऱ्याला अजून बराच वेळ आहे. जून महिन्याच्या पाच तारखेला हा दौरा (Tour) होत असला तरी मनसैनिकांनी आतापासूनच या दौऱ्याचा याचा प्रचार-प्रसार करण्यास सुरूवात केली आहे. मुंबईत (Mumbai) या दौऱ्यासाठीचे बॅनर्स लागले असून राज ठाकरेच्या या दौऱ्यात सर्वांनी सहभागी व्हावं असं आवाहन या बॅनर्समधून करण्यात आलं आहे. (Raj Thackeray's Upcoming Ayodhya Visit Banner In Mumbai)

हे देखील पाहा -

मनसे (MNS) अध्यक्ष राज यांची आज औरंगाबादमध्ये रविवारी सभा झाली. गुढीपाडव्याच्या सभेला (२ एप्रिलला) राज ठाकरेंनी मशिदीवरील भोंग्यासंदर्भात घेतलेल्या भूमिकेवरुन राज्यातील राजकीय वातावरण तापले होते. त्यानंतर ठाण्यातील उत्तरसभेमध्ये राज ठाकरे आपल्या भूमिकेवर ठाम राहिले. संबंध राज्यातून मनसेचे कार्यकर्ते राज ठाकरेंच्या सभेला आले होते. कालच्या औरंगाबादच्या सभेत राज ठाकरे म्हणाले होते की, मला कोणाच्या सणामध्ये मला विष कालवायचे नाही, पण चार तारखेपासून मी ऐकणार नाही. ४ तारखेनंतर जिथे-जिथे भोंगे लागतील तिथे हनुमान चालिसा लावणार, असंही ठाकरे म्हणाले. सरळ मार्गाने कोण ऐकत नसतील तर हेच करावे लागेल, असंही ठाकरे म्हणाले होते. मी हा मुद्दा अचानक काढलेला नाही. माझा कोणत्याही जातीला विरोध नाही. हा सामाजिक विषय आहे. हा विषय धार्मिक नाही. त्यामुळे धार्मिक विषय करु नका. महाराष्ट्रातील शांतता आम्हाला बिघडवायची नाही. उत्तर प्रदेशमधील लाऊडस्पीकर उतरवले जाऊ शकतात, मग आपल्या राज्यात का उतरवले जात नाहीत, असंही राज ठाकरे कालच्या सभेत म्हणाले. (Raj Thackerays Ayodhya Visit News)

Raj Thackeray's Upcoming Ayodhya Visit Banner In Mumbai
...म्हणून राज ठाकरे पवारसाहेबांवर टीका करतात; सुरेखा पुणेकरांची बोचरी टीका

दरम्यान कालची सभा गाजवल्यानंतर आता राज ठाकरे हे उत्तर प्रदेशातील अयोध्येत जाणार आहे. या ठिकाणी राम मंदिर बांधण्यात येत आहे. राज ठाकरे अयोध्येत जाऊन शक्तीप्रदर्शन करणार आहे. यासाठी मनसेच्या राज्यभरातील शेकडो कार्यकर्त्यांसाठी रेल्वेचे तिकीट बुक करण्यात येणार आहे. तसेच राज ठाकरेंच्या या दौऱ्याचा प्रचार आणि प्रसार करण्याठी मनसैनिक बरेच कष्ट घेत आहेत. त्यासाठी मुंबईत राज ठाकरेंच्या आगामी अयोध्या दौऱ्यासाठी आतापासूनच बॅनरबाजी करण्यात आली आहे.

Edited By - Akshay Baisane

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.