
Raj Thackeray Latest Speech : मनेसेचा एकमेव असलेला आमदार आहे विधासभेत बाजू मांडतोय, विधानसभा भरल्यावर काय होईल विचार करा. एक ही है लेकीन काफी है असे राज ठाकरे म्हणाले. तसेच भरती आली की ओहोटी देखील येते हे भाजपने लक्षात ठेवावं असा इशारा त्यांनी यावेळी भाजपला दिला आहे.
गुरुवारी सायंकाळी ठाण्यातील गडकरी रंगायतन येथे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या १७ व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात मनसे अध्यक्ष राज ठाकरे बोलत होते. यावेळी राज ठाकरे यांनी मनसेने केलेल्या आतापर्यंतच्या सर्व कामांची पुस्तिका प्रकाशित केली.
यावेळी बोलताना राज ठाकरे म्हणाले, 17 वर्षात पक्ष कशा कशातून जातोय. काही लोक म्हणतात काही जण पक्ष सोडून गेले, एक एकटे गेले. आपल्याला प्रश्न विचारला जातो राज ठाकरेंच्या सभांना एवढी गर्दी होते मग मतं का नाही पडत. मग ते 13 आमदान निवडून आले होते ते सोरटवर आले होते का असे राज ठाकरे म्हणाले. (Lateat Marathi News)
राज ठाकरे म्हणाले काही पत्रकार मला मोदी लाटेत माझं काय झालं हे काय विचारतात, आरे मला काय विचारता, काँग्रेसचं काय झालं ते पाहा ज्या पक्षाने या देशावर जवळपास 60 ते 65 वर्ष राज्य केलं, त्या पक्षाची अवस्था बघा. भरतीनंतर ओहोटी आणि ओहोटीनंतर भरती या गोष्टी तर होतातच, त्या नैसर्गिक आहे. भाजपनेही लक्षात ठेवलं पाहिजे आज भरती चालू आहे, ओहोटी येणार, कोणीही ते थांबवू शकत नाही, असा इशारा यावेळी बोलताना राज ठाकरे यांनी दिला.
राज ठाकरे म्हणाले आजच्या परिस्थीतीत सभागृहात राजू पाटील एकटा भांडतोय, संपूर्ण साभागृह भरलं तर काय होईल. एकही है लेकीन काफी है. यावेळी राज ठाकरेंनी मनसेने केलेल्या कामांचा देखील पाढा वाचला. (Latest Political News)
मनसेने केलेल्या आंदोलनांमुळे मोबाईलवर मराठी आली, मराठी चित्रपटांना हक्काची सिनेमा गृह मिळाली, मराठी चित्रपटासाठी सिंगल स्क्रीन ठेवली गेली, दुकानावरच्या पाट्या मराठीत झाल्या, रेल्वे भरतीची माहिती मराठीत मिळू लागली असे राज ठाकरे म्हणाले. महाराष्ट नवनिर्माण सेनेने गेल्या सतरा वर्षात जेवढी आंदोलनं केली तेवढी एकाही पक्षाने केली नाही असे देखील ते म्हणाले.
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.