Rajesh Tope: राज्यातील लॉकडाऊन अन् शाळा सुरु करण्याबाबत टोपे म्हणाले...

राज्यात पॉझिटिव्ह असताना देखील काहीजण रिपोर्ट करत नाहीत. लक्षणे नसली तरी घरी थांबा त्यांनी काय करावे किंवा नाही करावे याचे मार्गदर्शन करत असल्याचे टोपे म्हणाले..
Rajesh Tope: राज्यातील लॉकडाऊन अन् शाळा सुरु करण्याबाबत टोपे म्हणाले...
Rajesh TopeSaam Tv

सुशांत सावंत

मुंबई: देशात कोरोनाची रुग्णसंख्या पुन्हा वाढत आहे. आज राज्यात 46 हजार केसेस आढळल्या आहेत. राज्यातील जनतेला आणि मुंबईकरांना सांगेन रुग्णसंख्या कमी होतीये त्याच्या भ्रमात राहू नका असे आरोग्यमंत्री राजेश टोपे (Rajesh Tope) म्हणाले आहेत. 21.4 टक्के एवढा राज्याचा पॉझिटिव्ह रेट आहे. आज मुंबईचा 27 टक्के आहे. संख्या वाढत असली तरी 86 टक्के लोक हे गृह विलगीकरणात आहेत, आणि 1 टक्क्यापेक्षा कमी लोक आयसीयूमध्ये (ICU) आहेत. 32 टक्के व्हेंटिलेटरवर आहेत. तर 2.8 टक्के रुग्ण गंभीर कॅटेगरीमध्ये आहेत. मृत्यूदर हा देखील कमी आहे. 03 टक्के मृत्युदर आज आहे अशी संपुर्ण माहिती राजेश टोपे यांनी दिली आहे.

Rajesh Tope
UP: कॅबिनेट मंत्री दारा सिंग चौहान यांचा राजीनामा; सपामध्ये करणार प्रवेश

राज्यात पॉझिटिव्ह असताना देखील काहीजण रिपोर्ट करत नाहीत. लक्षणे नसली तरी घरी थांबा त्यांनी काय करावे किंवा नाही करावे याचे मार्गदर्शन करत आहोत असे राजेश टोपे म्हणाले. सेल्फ टेस्टिंग जरी केले तरी तुम्ही तुमच्या जवळच्या आरोग्य विभागाला सांगा, सर्वांनी पॉझिटिव्ह (Corona Positive) असाल तर कळवाल, लसीकरण (Corona Vaccine) दर कमी होताना दिसत आहे. लसीकरणाचे प्रमाण साडे सहा लाख होत आहे. आधी साठे आठ लाख व्हायचे लोक सर्व सवलती घेत आहेत, पण लस घेत नाहीत अशी खंत राजेश टोपे यांनी व्यक्त केली आहे. राज्यभरात लसीकरणाला गती येण्यासाठी जिल्हा स्तरावर कारवाई केली आहे.

राज्यात पहिला डोस 90 टक्के लोकांनी तर दुसरा डोस घेतलेले 62 टक्के लोक आहेत. आज 15 ते 18 वयोगटातील लसीकरण झालेले विद्यार्थी 35 टक्के झाले आहेत. कोविडची दुसरी लाट आली होती तेव्हा नॉन कोविड आपण थांबवली होती. आता पॅनिक होण्याची स्थिती नाही पण काळजी घेणे गरजेचे आहे असे आवाहन राजेश टोपे यांनी पत्रकार परिषदेच्या माध्यमातून केलं आहे. शाळेच्या बाबत देखील चर्चा झालेली आहे. आता मराठवाडा विदर्भात देखील रुग्ण वाढत आहेत. त्यामुळे आणखी 15 दिवस तरी शाळा बंद राहणार आहेत. जशीजसी संख्या वाढेल तेव्हढी ऑक्सिजनची संख्या वाढू शकते.

कोविडचा कहर सुरू आहे, त्यावरून फेब्रुवारीच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत शिथिलता येईल असे वाटत नाही. मास्क लावू नये असे जे सांगत आहेत त्यांच्यावर कारवाई होईल असे राजेश टोपे म्हणाले. रेल्वेमध्ये गर्दी होत असेल तर आपण अट टाकली आहे की दोन डोस घेतले असेल तरच जा लोकांनी सकारात्मक प्रतिसाद द्यावा असे आवाहनही यावेळी त्यांनी केले.

Edited By: Pravin Dhamale

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Latest and Breaking News in Marathi | Live Marathi News Updates | live tv streaming in Marathi | Saam TV
www.saamtv.com