सराईत गुन्हेगारांकडून गावठी पिस्तुलसह जिवंत काडतुसे जप्त
सराईत गुन्हेगारांकडून गावठी पिस्तुलसह जिवंत काडतुसे जप्तसागर आव्हाड

सराईत गुन्हेगारांकडून गावठी पिस्तुलसह जिवंत काडतुसे जप्त

आरोपींकडून एकूण 1 लाख 55 हजार 200 किंमतीचा मुद्देमाल जप्त

पुणे - पुणे Pune ग्रामीण पोलीस Police स्थानिक गुन्हे शाखा यांनी तडीपार गुंड आणि सराईत गुन्हेगार यांच्या कडून 3 गावठी पिस्तुलसह 2 जिवंत काडतुसे जप्त केली आहेत. स्थानिक गुन्हे शाखेच्या एका पथकास राजगड पोलीस स्टेशन Rajgad Police Station हद्दीत पेट्रोलिंग करीत असताना माहिती मिळाली होती.

या माहितीवरून 2 इसम एक काळ्या रंगाच्या ऍक्टिवा गाडी वरून कोंढाणपूर फाटा ब्रिज जवळ येणार असल्याचे समजले. त्यावरून त्या ठिकाणी पथकाद्वारे सापळा रचून काळ्या रंगाच्या ऍक्टिवा गाडी वरून येणाऱ्या 2 दोघांना ताब्यात घेतले.

हे देखील पहा -

रोहित अवचरे, आदित्य साठे अशी त्यांची नाव आहेत त्यांची झडती घेतली असता दोघांच्याही कंबरेला गावठी बनावटीचे पिस्तुल आढळून आले. तसेच त्यांच्या जवळील गाडीची डिकी चेक केली असता त्यामध्ये 1 गावठी पिस्तुल आणि 2 जिवंत काडतुसे आढळून आली.

सराईत गुन्हेगारांकडून गावठी पिस्तुलसह जिवंत काडतुसे जप्त
कंटेनरने दुचाकीला ठाेकले; खामगावातील युवक ठार, एक गंभीर

सदरच्या आरोपींची आणखीन माहिती घेतली असता आरोपी रोहित हा पुणे जिल्ह्यातील तडीपार गुंड असून त्याची तडीपार मुदत संपलेली नाही. या आरोपींकडून एकूण 1 लाख 55 हजार 200 किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. दोनीही आरोपींना राजगड पोलिसांच्या हवाले करण्यात आले आहे. पुढील कारवाई राजगड पोलीस करीत आहे.

Edited By - Shivani Tichkule

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com