राष्ट्रपती निवडणुकीबाबत राजनाथ सिंहांचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना फोन

राष्ट्रपतीपदाची निवडणूक बिनविरोध होण्यासाठी भाजपकडून पावले उचलली जात आहेत.
Rajnath Singh Uddhav Thackeray
Rajnath Singh Uddhav ThackeraySaam TV

मुंबई : राष्ट्रपती निवडणुकीबाबत संरक्षण मंत्री राजनाथ सिंह (Rajnath Singh) यांनी शिवसेना नेते तथा राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना फोन केल्याची माहिती सुत्रांद्वारे मिळतं आहे. देशभरातील भाजपविरोधी नेत्यांना एकत्र करुन येत्या राष्ट्रपतीपदाचे निवडणुकीत भाजपचा पराभव करण्यासाठी काल नवी दिल्ली येथे पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) यांनी भाजप व्यतिरिक्त सर्व पक्षांची बैठक आयोजित केली होती.

या विरोधकांच्या बैठकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनीच राष्ट्रपदीपदाची निवडणूक लढवावी अशी चर्चा झाल्याचं काल ममता बॅनर्जी यांनी सांगितलं होतं. मात्र, खुद्द शरद पवारांनी आपण या निवडणुकीसाठी इच्छुक नसल्याचं सांगितलं आहे. मात्र, याआधी देखील शिवसेना, काँग्रेस आणि आम आदमी पार्टीने शरद पवार राष्ट्रपतीपदाचे उमेदवार असतील तर आम्ही त्यांना पाठिंबा द्यायला तयार असल्याचं सांगितलं होते.

अशातच आता राष्ट्रपती निवडणुकीबाबत राजनाथ सिंह यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना फोन केल्याची माहिती सुत्रांकडून मिळाल्यामुळे. आता वेगवेगळ्या राजकीय चर्चांना उधाण आलं आहे. राष्ट्रपती निवडणूकीबाबत राजनाथ सिंह यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना फोन करत एनडीएच्या उमेदवाराला मदत करण्यासाठी फोन केल्याची माहिती समोर येत असून राष्ट्रपती निवडणूक बिनविरोध होण्यासाठी भाजपकडून पावले उचलली जात आहेत.

मात्र, राज्यात महाविकास आघाडी सरकार सत्तेत आल्यापासून भाजप विरुद्ध शिवसेना असा संघर्ष सुरु आहे. भाजप आणि शिवसेना एकमेकांवरती आरोप-प्रत्यारोप करण्याची एकही संधी सोडत नाहीत. तर दुसरीकडे संजय राऊत शरद पवारांचं तोंड भरुन कौतुक करत असतात त्यामुळे आज राजनाथ सिंह यांनी मुख्यमंत्र्यांना केलेल्या फोनमुळे शिवसेना भाजपच्या उमेदवाराला मतदान देईल का? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

Edited By - Jagdish Patil

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com