
मुंबई: राज्यसभेच्या (Rajya Sabha Election 2022) सहा जागांसाठी आज, शुक्रवारी मतदान होत आहे. भाजप आणि महाविकास आघाडीमध्ये मोठी चुरस आहे. दोघांसाठीही एकेक मत महत्वाचे आहे. अशावेळी रुग्णालयात दाखल असताना मुक्ता टिळक (Mukta Tilak) आणि लक्ष्मण जगताप हे (Laxman Jagtap) भाजपचे दोन्ही आमदार मतदानासाठी मुंबईत पोहोचले आहेत. मुक्ता टिळक या स्ट्रेचरवरून विधानभवनात मतदानासाठी आल्या. तर जगताप हे अॅम्ब्युलन्समधून विधानभवनात आले.
हे देखील पाहा -
राज्यसभा निवडणुकीसाठी मतदान (Voting) होत असून, दुपारी साडेबारा वाजेपर्यंत २३८ सर्वपक्षीय आमदारांनी मतदान केले आहे. महाविकास आघाडी आणि भाजपमध्ये जोरदार चुरस पाहायला मिळत आहे. दोघांसाठीही एकेक मत महत्वाचे आहे. सर्वच आमदारांनी मतदान करावं यासाठी महाविकास आघाडी आणि भाजपच्या वरिष्ठ नेत्यांकडून प्रयत्न केले जात आहेत. अशातच लक्ष्मण जगताप आणि मुक्ता टिळक हे आजारी असतानाही मतदानासाठी विधानभवनात पोहोचले.
लक्ष्मण जगताप हे गेल्या काही दिवसांपासून आजारी आहेत. आजारी असतानाही ते मतदानासाठी विधानभवनात पोहोचले आहेत. अॅम्ब्युलन्समधून ते मतदानासाठी आले आहेत. मुक्ता टिळक या देखील मतदानासाठी मुंबईत आल्या आहेत. लक्ष्मण जगताप हे गेल्या तीन-चार महिन्यांपासून रुग्णालयात आयसीयूत होते. त्यांच्यावर उपचार सुरू होते. काही दिवसांपूर्वीच त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले होते. अशाही परिस्थितीत ते पुण्यातून ते डॉक्टरांच्या पथकासह अॅम्ब्युलन्समधून मुंबईत पोहोचले. त्यांना उभं राहण्यासाठीही आधार घ्यावा लागतो. श्वसनाचा त्रास आहे. जगताप हे विधानभवनात पोहोचल्यानंतर त्यांना घेण्यासाठी देवेंद्र फडणवीस आले होते.
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.