Rajya Sabha Election: राज्यात राजकीय घडामोडींना वेग; अशी असेल भाजपची उद्याची रणनीती

देवेंद्र फडणवीस पुन्हा अॅक्शनमोड मध्ये आले आहे, आज आमदारांची बैठक घेणार आहेत.
Rajya Sabha Election: राज्यात राजकीय घडामोडींना वेग; अशी असेल भाजपची उद्याची रणनीती
Rajya Sabha ElectionSaam Tv

सुशांत सावंत

मुंबई: राज्यात राज्यसभा निवडणुकीची चर्चा जोरदार सुरू आहे. महाराष्ट्रात राज्यसभेच्या सहा जागासाठी निवडणूक (Election) होत आहे. सहा जागांसाठी ७ जणांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. देशभरात ५७ जागांसाठी ही निवडणूक होत आहे. राज्यसभेसाठी भाजपने जोरदार तयारी केली आहे. भाजपकडून (BJP) कोल्हापुरचे माजी खासदार धनंजय महाडिक, पीयूष गोयल, डॉ. अनिल बोंडे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. देवेंद्र फडणवीस कोरोना पॉझिटिव्ह होते, त्यामुळे ते ऑनलाइन बैठकींना हजेरी लावत होते. आज त्यांचा कोरोना अहवाल निगेटिव्ह आला आहे, त्यामुळे आता फडणवीस पुन्हा पुन्हा अॅक्टिव्ह झाले आहेत.

भाजपचे १०५ आमदारांना सध्या ताज हॉटेलमध्ये ठेवण्यात आले आहेत. उद्याची रणनीती ठरवण्यासाठी देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आज ताजमध्ये आमदारांची बैठक घेणार आहेत. गेल्या दोन दिवसापासून राजकारणात नाट्यमय घडामोडी घडत आहेत. महाविकास आघाडीच्याही आमदारांना मुंबईतील ट्रायडंट हॉटेलमध्ये ठेवण्यात आले आहे.

Rajya Sabha Election
राज ठाकरेंच्या भेटीनंतर वसंत मोरेंची पहिली प्रतिक्रीया; म्हणाले...

भाजपची उद्याची रणनीती अशी असेल

उद्या भाजपच्या (BJP) आमदारांचे गट तयार केले जाणार आहेत. प्रत्येक गटाची जबाबदारी एका नेत्याकडे देण्यात येणार आहे. एका गटात दहा-दहा आमदार असणार आहेत. गटाचा नेता आपल्या दहा आमदारांना मतदान कसे करायचे याची माहिती देणार आहे. या आमदारांना मतदानाचा प्राधान्य क्रमही ठरवून देण्यात येणार आहे.

उद्या विधान भवनात देवेंद्र फडणवीस प्रत्येक आमदाराची मतदान कसे केले याची खातरजमा करणार आहेत. या सर्व प्रक्रियेवर आमदार आशिष शेलारही बारीक लक्ष ठेवून असणार आहेत. तसेच भाजपने गिरीष महाजन आणि प्रसाद लाड यांच्याकडेही विशेष जबाबदारी दिली जाणार आहे.

Rajya Sabha Election
राज्यात ठिकठिकाणी तुरळक पाऊस; महाराष्ट्रात कधी बरसणार मान्सून?

महाविकास आघाडीचे (Mahavikas Aghadi) आमदारही ट्रायडंट हॉटेलमध्ये ठेवण्यात आले आहेत. या आमदारांनाही मतदान कसे करायचे याची प्रक्रिया कशी असणार आहे. याची सर्व माहिती देण्यात आली आहे. महाविकास आघाडीला १३ अपक्ष आमदारांनी पाठिंबा दिला आहे. त्यामुळे महाविकास आघाडीला काहीसा दिलासा आहे, पण ईडीच्या कारागृहात असलेले माजी गृहमंत्री अनिल देशमुख आणि नवाब मलिक यांनी मतदानासाठी परवानगीचा केलेला अर्ज मुंबई सत्रन्यायालयाने फेटाळला आहे, त्यामुळे महाविकास आघाडीची दोन मत कमी झाली आहेत. यामुळे आता महाविकास आघाडीचे टेन्शन वाढले आहे.

Rajya Sabha Election
Rajya Sabha Election: मोठी बातमी! राज्यसभा निवडणुकीआधी महाविकास आघाडीला मोठा झटका

महाविकास आघाडीचे उमेदवार कोण आहेत?

काँग्रेस- इमरान प्रतापगढी

राष्ट्रवादी काँग्रेस- प्रफुल्ल पटेल

शिवसेना- संजय राऊत, संजय पवार

मतदान कधी होणार?

राज्यसभेसाठी निवडणूक १० जून रोजी, राजभवन येथे होणार आहे. उद्याची रात्री निकाल लागणार आहे.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com