भाजपकडून जितेंद्र आव्हाड-यशोमती ठाकूर यांचे मत बाद करण्याची मागणी; वाचा नेमकं काय घडलं

आजच राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) आणि काँग्रेसच्या नेत्या यशोमती ठाकूर (Yashomati Thakur) यांचे मतदान बाद करण्याची मागणी भाजपने केली आहे.
भाजपकडून जितेंद्र आव्हाड-यशोमती ठाकूर यांचे मत बाद करण्याची मागणी; वाचा नेमकं काय घडलं
jitendra Awhad And Yashomati ThakurSaam Tv

सुशांत सावंत

मुंबई : राज्यसभेच्या निवडणुकीच्या मदतानासाठी सुरुवात झाली आहे. या निवडणुकीत महाविकास आघाडी आणि भाजपमध्ये जोरदार चुरस पाहायला मिळत आहे. या निवडणुकीत प्रत्येक आमदाराचं मतदानाचं मतमूल्य महत्वाचं आहे. या निवडणुकीसाठी भाजप आमदार मुक्ता टिळक आणि लक्ष्मण जगताप यांनी आजारी असताना विधानभवनात येऊन मतदानाचा अधिकार बजावला आहे. सकाळी नऊ वाजल्यापासून विधानभवनात राज्यसभेच्या निवडणुकीसाठी मतदानाला सुरुवात झाली आहे. दरम्यान, आजच राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) आणि काँग्रेसच्या नेत्या यशोमती ठाकूर (Yashomati Thakur) यांचे मतदान बाद करण्याची मागणी भाजपने केली आहे. हे दोन्ही मतं बाद केल्यास महाविकास आघाडी अडचणीत येण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. ( Rajya sabha Election 22 Voting News In Marathi )

jitendra Awhad And Yashomati Thakur
मोठी बातमी! राज्यसभा निवडणुकीत राष्ट्रवादीची दोन मतं कमी

नेमकं काय घडलं ?

राज्यसभेच्या सहा जागेसाठी मतदानाला सुरुवात झाली आहे. दोन वाजेपर्यंत 281 आमदारांचं मतदान झालं आहे. राज्यसभेच्या निवडणुकीसाठी महाविकास आघाडी आणि भाजपचे पोलिंग एजंट मतदानाच्या ठिकाणी बसले आहेत. दरम्यान, भाजपचे पोलिंग एजंट पराग अळवणी यांनी जितेंद्र आव्हाड आणि यशोमती ठाकूर यांची मत बाद करण्याची मागणी केली आहे. आमदारांनी मतदान केल्यानंतर आपल्या गटाने नेमून दिलेल्या प्रतिनिधीला आपली मतपत्रिका दाखवणे आवश्यक आहे.

jitendra Awhad And Yashomati Thakur
Video: राष्ट्रवादीचे आमदार दिलीप मोहिते नाराज; मतदानापूर्वीच मुख्यमंत्र्यांवर टीका

यावेळी जितेंद्र आव्हाड यांनी आपली मतपत्रिका राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या हातात दिली. तर यशोमती ठाकूर यांनीही आपली मतपत्रिका काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या हातात दिली. त्यावर भाजपचे पोलिंग पराग अळवणी यांनी हरकत नोंदवत त्यांची दोन्ही मतं बाद करण्याची मागणी केली आहे. भाजपने आतापर्यंत तीन मतांवर आक्षेप घेतला आहे. भाजपने आक्षेप घेतलेल्या मतांमध्ये सुहास कांदे, जितेंद्र आव्हाड आणि यशोमती ठाकूर यांच्या नावाचा सामावेश आहे. स्थानिक अधिकाऱ्यांनी मतांवरील आक्षेप फेटाळले तर भाजप केंद्रीय निवडणूक आयोगाकडे धाव घेण्याच्या तयारीत असल्याचेही बोलले जात आहे. तसेच काँग्रेसचे आमदार अमर राजुरकर यांनी भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांच्या मतावर आक्षेप घेतला आहे. त्यामुळं ही मतं बाद करण्यात येऊ शकतात का, हे पाहावे लागणार आहे.

महाविकास आघाडीला मोठा धक्का

दरम्यान, राज्यसभेच्या निवडणुकीच्या मतदानासाठी अनिल देशमुख आणि नवाब मलिक यांना मतदानाची परवानगी नाकारण्यात आली आहे. हायकोर्टानेही अनिल देखमुख यांची सुनावणी घेण्यास नकार दिला आहे. तर मलिकांची याचिका देखील चुकीची असल्याचं म्हटलं आहे. त्यामुळे दोघांचा राज्यसभेच्या निवडणुकीसाठी मतदानाचा अधिकार नाकारण्यात आला आहे.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com