'हिंदुत्व जागे असेल तर ठाकरे सरकार सलमान खुर्शीदला अटक करेल'

हिंदू समाजाला दहशतवादी संघटनांबराेबर तुलना करणा-या विराेधात ठाकरे सरकार गप्प का आहे. कूठे गेली शिवसेना, कूठे गेले त्यांचे हिंदूत्व असा प्रश्न राम कदम यांनी उपस्थित केला आहे.
'हिंदुत्व जागे असेल तर ठाकरे सरकार सलमान खुर्शीदला अटक करेल'
bjp protest against congress leader salman khurshid

मुंबई : काँग्रेस नेत्यांचे तळवे चाटण्याचा काम सलमान खुर्शीद करत आहेत आणि जर शिवसेनेमध्ये हिंदुत्व अद्यापही कायम असेल तर त्यांनी सलमान खुर्शीद विरोधात गुन्हा दाखल करावा अशी मागणी आमदार राम कदम यांनी केली आहे. घाटकोपर येथील पोलिस ठाण्याबाहेर भाजपाने सलमान खुर्शीद यांच्या विरोधात जोरदार निदर्शने केली. त्यावेळी आमदार राम कदम बाेलत हाेते. ram kadam bjp protests salman khurshid book ghatkopar police station

bjp protest against congress leader salman khurshid
IND vs NZ: अजिंक्य रहाणे कर्णधार; शर्मा,पंत,बुमराह,शमीला ब्रेक

काँग्रेस नेते सलमान खुर्शीद यांच्या पुस्तकात हिंदू धर्माविषयी अपमान करणारे विधान लिहिण्यात आलेले आहे असल्याचा दावा करीत त्या विरोधात तक्रार दाखल करण्यासाठी भाजप आमदार राम कदम यांनी घाटकोपर पोलिस ठाण्याबाहेर आपल्या कार्यकर्त्यांसह आंदोलन करायला सुरुवात केली आहे. खुर्शीद यांच्या प्रतिकात्मक प्रतिकृतीस आंदाेलकांनी जोडे मारण्यास प्रारंभ केला. यावेळी राम कदम म्हणाले सलमान खुर्शीद यांच्या पुस्तकावर निर्बंध लादावेत अन्यथा जिथे जिथे हे पुस्तक मिळेल तिथे या पुस्तकाची होळी केली जाईल. हिंदू समाजाचा, धर्माचा अनेकदा अहंकारापाेटी अपमान केला आहे. महाराष्ट्रच्या ठाकरे सरकारने त्यांच्यावर कारवाई करावी. हिंदू समाजाची ISS बराेबर तुलना करता. त्याने खूशाल पाकिस्तानात जावे.

ठाकरे सरकारचे हिंदुत्व जागे असेल तर सलमान खुर्शीदला तातडीने अटक करावी. त्याच्या पुस्तकावर बंदी घालावी. एखाद्या समाजाला दुखवणे ही त्याच्या विचारधारा आहे का? असा प्रश्न कदमांनी उपस्थित केला आहे. हिंदू समाजाला दहशतवादी संघटनांबराेबर तुलना करणा-या विराेधात ठाकरे सरकार गप्प का आहे. कूठे गेली शिवसेना, कूठे गेले त्यांचे हिंदूत्व असा प्रश्न कदम यांनी केला आहे.

edited by : siddharth latkar

Related Stories

No stories found.
Latest and Breaking News in Marathi | Live Marathi News Updates | live tv streaming in Marathi | Saam TV
www.saamtv.com