ठरलेलं विमान टाळत, राणेंचा प्रवास दुसऱ्या विमानाने; चिपी विमानतळ उद्घाटनाच मानपमान नाट्य थांबता थांबेना !
ठरलेलं विमान टाळत, राणेंचा प्रवास दुसऱ्या विमानाने; चिपी विमानतळ उद्घाटनाच मानपमान नाट्य थांबता थांबेना !SaamTV

ठरलेलं विमान टाळत, राणेंचा प्रवास दुसऱ्या विमानाने; चिपी विमानतळ उद्घाटनाच मानपमान नाट्य थांबता थांबेना !

चिपी विमानतळाच्या लोकार्पण कार्यक्रमापूर्वीच टोकाचं राजकारण आणि मानपमान नाट्य पहायला मिळत आहे.

मुंबई : सिंधुदूर्ग Sindhudurg जिल्ह्यातील चिपी विमानतळाच्या Chipi Airport लोकार्पण कार्यक्रमात मोठं मान अपमान नाट्य रंगताना पहायला मिळत आहे. शिवसेना आणि भाजप Shivsena BJPप्रामुख्याने राणे कुचुंबीय यांच्यामध्ये आता या विमानतळाच्या श्रेयवादावरून चांगलीच चढाओढ पहायला मिळतं आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे CM Uddhav Thackeray आणि उपमुख्यमंत्री अजीत पवार Ajit Pawar आणि मंत्रीमंडळातील प्रमुख मंत्री ज्या एलाइंस एअर च्या पहिल्या प्रवासी विमानाने चिपी विमानतळावर दाखल होणार होते. त्याच विमानाने केंद्रीय मंत्री नारायण राणे देखील येणार होते तसं नियोजित होतं मात्र आता त्या विमानाने येण्याच राणें यांनी टाळंल आहे. (Rane travels by another plane, avoiding the flight scheduled for the inauguration of Chipi Airport)

नारायण राणे Narayan Rane यांनी एकत्र प्रवास करण्याचं टाळल असून त्या एवजी राणे आणि राज्यातील भाजपचे आमदार पदाधिकारी चाटर्ड विमानाने चिपी विमानतळावर दाखल होणार असल्याची माहीती सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे चिपी विमानतळाच्या लोकार्पण कार्यक्रमापूर्वीच टोकाचं राजकारण आणि मानपमान नाट्य चिपी विमानतळावर पहायला मिळतंय.

ठरलेलं विमान टाळत, राणेंचा प्रवास दुसऱ्या विमानाने; चिपी विमानतळ उद्घाटनाच मानपमान नाट्य थांबता थांबेना !
बायकोला तिकीट दिले नाही म्हणून, नवऱ्याने पसरवली विमानात बॉम्ब असल्याची अफवा!

दरम्यान एकमेकांच्या कट्टर विरोधक असणारे शिवसेना नेते आणि राणे कुटुंवीय आज शेजारी बसणार आहेत कारण त्यांच्या खुर्च्या कार्यक्रमाच्या ठिकाणी त्या पध्दतीने लावल्या आहेत. नितेश राणेंच्या बाजूला वैभव नाईक तर नारायण राणे आणि उद्धव ठाकरे बाजूला आहेत अशा प्रकारे ते बसणार असल्याने आजच्या कार्यक्रमाकडे संपुर्ण राज्याची नजर लागून राहीलेली आहे.

Edited By - Jagdish Patil

Related Stories

No stories found.