Ranjit Savarkar : एका बाईसाठी पंडित नेहरू यांनी देशाची फाळणी मान्य केली; रणजित सावरकरांचं वादग्रस्त विधान

एका बाईसाठी पंडित नेहरू यांनी देशाची फाळणी केली होती, असं वादग्रस्त विधान रणजित सावरकर यांनी केलं आहे.
Ranjit Savarkar On Pandit Nehru
Ranjit Savarkar On Pandit NehruSaam TV

Ranjit Savarkar On Pandit Nehru : विनायक सावरकर यांचे नातू रणजित सावरकर यांनी थेट दिवंगत पंतप्रधान पंडित नेहरू यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. एका बाईसाठी पंडित नेहरू यांनी देशाची फाळणी केली होती, असं वादग्रस्त विधान रणजित सावरकर यांनी केलं आहे. इतकंच नाही तर, पंडित नेहरू हे १२ वर्षे भारताची गुप्त माहिती ब्रिटीश सरकारला देत होते, असा आरोपही त्यांनी केला आहे. (Maharashtra News)

Ranjit Savarkar On Pandit Nehru
MSRTC Employees : एसटी कामगारांसाठी आनंदाची बातमी; CM शिंदेंनी घेतला मोठा निर्णय

रणजित सावकर यांच्या या विधानानंतर मोठा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. गेल्या काही दिवसांपासून सावकरांच्या मुद्द्यावरून राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी भारत जोडो यात्रेदरम्यान बोलताना विनायक सावरकर यांच्या माफीनाम्याच्या पत्राबाबत विधान केले होते. त्यांच्या विधानानंतर भाजपसह मनसेनं आक्रमक भूमिका घेतली.

राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रेदरम्यानची बुलडाण्यातील सभा उधळून लावू, असा इशारा दिला होता. दुसरीकडे भाजपने महाराष्ट्रभरात राहुल गांधी यांच्या निषेधार्थ आंदोलनही केलं. दरम्यान, राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या विरोधात विधान केल्याने सावरकरांचे नातू त्यांना काय उत्तर देणार? याकडे सर्वांचंच लक्ष लागून होतं.

आज विनायक सावकर यांचे नातू रणजित सावरकर यांनी मुंबईत पत्रकारपरिषद घेतली. या पत्रकारपरिषदेत त्यांनी पंडित नेहरू यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. "एका बाईसाठी पंडित नेहरूंनी देशाची फाळणी केला होती, पंडित नेहरूंना हनीट्रॅपमध्ये अडकवून देशाची फाळणी केला, १२ वर्षे नेहरू भारताची गुप्त माहिती ब्रिटीश सरकारला देत होते", असा गंभीर आरोप रणजित सावरकर यांनी केला आहे.

Ranjit Savarkar On Pandit Nehru
Uttarakhand : उत्तराखंडमध्ये मोठी दुर्घटना! पर्यटकांनी भरलेली व्हॅन दरीत कोसळली, १२ जणांचा मृत्यू

इतकंच नाही तर, "माझी भारत सरकारला विनंती आहे की नेहरू आणि एलविना पत्र व्यवहार ब्रिटीशांना मागावा आणि तो जनतेत जाहीर करावा, तेव्हा जनतेला कळेल ज्याला आपण चाचा नेहरू म्हणतो त्या नेत्याने देशाची कशी फाळणी केली ते समजेल", असंही रणजित सावकर यांनी म्हटलं आहे.

त्यांच्या या विधानामुळे आता पुन्हा एकदा नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे. सावरकरांच्या या विधानानंतर अजूनही कोणत्याही काँग्रेस नेत्याची प्रतिक्रिया आलेली नाही. रणजीत सावरकर हे विनायक दामोदर सावरकर यांचे नातू आहेत. ते हिंदुत्त्ववादी विचारांचे समर्थक आहेत. तर स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक या संस्थेचे ते अध्यक्ष आहेत. हिंदुत्व हेच राष्ट्रीयत्व ही त्यांची भूमिका आहे.

Edited By - Satish Daud

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com