सावरकरांवरील आक्षेपार्ह विधान राहुल गांधींना भोवणार? सावरकरांचे नातू तक्रार दाखल करणार

Rahul Gandhi On Sawarkar News: सावरकरांबद्दल चुकीची विधाने केल्याप्रकरणी खुद्द सावरकरांचे नातू रणजीत सावरकर हे आज दादर पोलीस स्टेशनला जाऊन तक्रार दाखल करणार असल्याची माहिती मिळत आहे.
Rahul Gandhi On Sawarkar News
Rahul Gandhi On Sawarkar NewsSaam TV

Rahul Gandhi Latest News: राहुल गांधींबाबत एक मोठी बातमी समोर येतेय. कॉंग्रेसचे खासदार राहुल गांधी यांनी सावरकरांबाबत केलेल्या आक्षेपार्ह विधानामुळे त्यांच्या अडचणी वाढू शकतात. याचं कारण म्हणजे राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्या विरोधात दादर पोलीस स्टेशनला तक्रार दाखल करण्यात येणार आहे.

सावरकरांबद्दल (Swatantryaveer Sawarkar) चुकीची विधाने केल्याप्रकरणी खुद्द सावरकरांचे नातू रणजीत सावरकर हे आज दादर पोलीस स्टेशनला जाऊन तक्रार दाखल करणार असल्याची माहिती मिळत आहे. यावेळी त्यांच्यासोबत शिंदे गटातील खासदार राहुल शेवाळे हेदेखील जाणार आहेत अशी माहिती रणजीत सावरकर यांनी साम टीव्हीला दिली आहे. (Rahul Gandhi On Sawarkar News)

Rahul Gandhi On Sawarkar News
Mumbai: नारायण राणेंच्या अधीश बंगल्यातील अनधिकृत बांधकामाच्या पाडकामाला सुरूवात; कोर्टाच्या आदेशाची अंमलबजावणी

राहुल गांधी यांच्या नेतृत्वात सुरू असलेली 'भारत जोडो यात्रा' महाराष्ट्रात पोहोचली आहे. या यात्रेत हजारो काँग्रेस समर्थक सहभाग नोंदवत आहेत. याचदरम्यान, राहुल गांधी हे वीर सावरकरांच्या विरोधात वादग्रस्त वक्तव्य करत आहेत. त्यामुळे आता राहुल गांधींच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.

राहुल यांनी बिरसा मुंडा आणि सावरकरांवर केले भाष्य

बिरसा मुंडा यांची जयंती आदिवासी गौरव दिन म्हणून साजरी केली जाते. यावेळी राहुल गांधी म्हणाले, "बिरसा मुंडा एक इंचही मागे सरकले नाहीत. ते हुतात्मा झाले. ही तुमची (आदिवासींची) चिन्हे आहेत आणि तुम्हाला मार्ग दाखवतात. सावरकर हे भाजप-आरएसएसचे प्रतीक आहेत. ते दोन-तीन वर्षे अंदमानच्या तुरुंगात राहिले. त्यांनी दयेचे अर्ज लिहायला सुरुवात केली.

राहुल गांधींनी असा दावा केला होता की, सावरकरांनी वेगळ्या नावाने स्वतःवर एक पुस्तक लिहिले आणि ते किती शूर होते हे सांगितले. ते म्हणाले, "ते इंग्रजांकडून पेन्शन घ्यायचे, त्यांच्यासाठी काम करायचे आणि काँग्रेसच्या विरोधात काम करायचे."

Rahul Gandhi On Sawarkar News
Measles Disease In Mumbai: मुंबईत गोवर आजाराचा संसर्ग वाढला; मुख्यमंत्र्यांनी बोलावली तातडीची बैठक

फडणवीसांनी राहुल गांधींवर टीका

दरम्यान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नेते राहुल गांधी यांनी वीर सावरकरांवर केलेल्या भाष्याचा त्यांनी खरपूस समाचार घेतला. 'काँग्रेसच्या वतीने सावरकरांबद्दल रोज खोटं बोललं जात आहे. स्वातंत्र्य लढ्यात असलेल्या सर्वांचा मला आदर आहे. पण अत्याचार सहन करणारा सावरकारांसारखा एक नेता दाखवा. अंदमानमध्ये सावरकर गेले नसते, तर शेकडो कैद्यांनी आत्महत्या केली असती किंवा ते वेडे झाले असते. राहुल गांधी यांना सावरकरांचा स देखील माहीत नाही, अशा शब्दात देवेंद्र फडणवीसांनी राहुल गांधींवर जोरदार टीका केली. (Latest Marathi News)


Edited By - Akshay Baisane

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com