मालाडमध्ये 16 वर्षीय मुलीवर बलात्कार...

पीडित मुलगी 16 वर्षाची असून ती मूळची उत्तरप्रदेशची आहे. मोबाईलवर चॅटिंग करण्यावरून आई ओरडल्याने ती घर सोडून पळून गेली होती.
मालाडमध्ये 16 वर्षीय मुलीवर बलात्कार...
मालाडमध्ये 16 वर्षीय मुलीवर बलात्कार... Saam Tv

मालाडच्या मालवणीत अल्पवयीन मुलीवर सामुहिक बलात्कार करण्यात आला आहे. पीडित मुलगी 16 वर्षाची असून ती मूळची उत्तरप्रदेशची आहे. मोबाईलवर चॅटिंग करण्यावरून आई ओरडल्याने ती घर सोडून पळून गेली होती. सौरभ सिंह या आरोपीने लग्न केल्याचे सांगून पीडितेवर सिकंदराबाद उत्तरप्रदेश येथे अत्याचार केले.

तर दुसरा आरोपी हा एक रिक्षावाला असून त्याने तरुणीला राहण्यास मदत करण्याच्या नावाखाली फरेब जिल्हा आग्रा, उत्तरप्रदेश ते वृदांवन येथे तिसऱ्या आरोपीच्या ताब्यात दिले. नारायण ठाकूर असे या तिसऱ्या आरोपीचे नाव असून त्याने पिडीतेला सरबतातून गुंगीचे औषध देत, तिच्यावर अतिप्रसंग केला.

ऐवढ्यावरच न थांबता आरोपींने तिला गैरप्रकारे लपवून ठेवले. तिच्यावर सचिन पंडीत या चौथ्या आरोपीनेही बळजबरी केल्याचे पोलिस तपासात समोर आले आहे. या प्रकरणी मालवणी पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला असून पिडीत मुलीला जोगेश्वरीच़्या सुधारगृहात दाखल केलं आहे. हा गुन्हा पुढील तपासाकरता सिकंदराबाद पोलिस ठाणे, उत्तरप्रदेश येथे वर्ग करण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.

Edited By: Pravin Dhamale

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com