Pune : निवृत्त ACP असल्याचे सांगून शिक्षिकेवर बलात्कार; वाचा घटनेचा सविस्तर वृत्तांत
Pune : निवृत्त ACP असल्याचे सांगून शिक्षिकेवर बलात्कार; वाचा घटनेचा सविस्तर वृत्तांतSaamTv

Pune : निवृत्त ACP असल्याचे सांगून शिक्षिकेवर बलात्कार; वाचा घटनेचा सविस्तर वृत्तांत

काही दिवसांपूर्वीच पुण्यात अल्पवयीन मुलींवर झालेल्या बलात्काराच्या दोन घटना त्यापाठोपाठ साकीनाका मुंबई येथे अत्यंत अमानुषपणे झालेली निर्भया प्रकरणाची पुनरावृत्ती आणि सांगवी मधील शिक्षिकेवर झालेला बलात्कार या सर्व प्रकरणांनी महाराष्ट्रातील कायदा व सुव्यवस्थचे धिंडवडे उडाल्याचे चित्र आता स्पष्ट झाले आहे.

पिंपरी-चिंचवड : शहरातील सांगवी परिसरात घडलेल्या धक्कादायक घटनेने एकच खळबळ उडाली आहे. काही दिवसांपूर्वीच पुण्यात अल्पवयीन मुलींवर झालेल्या बलात्काराच्या दोन घटना त्यापाठोपाठ साकीनाका मुंबई येथे अत्यंत अमानुषपणे झालेली निर्भया प्रकरणाची पुनरावृत्ती आणि सांगवी मधील शिक्षिकेवर झालेला बलात्कार या सर्व प्रकरणांनी महाराष्ट्रातील कायदा व सुव्यवस्थचे धिंडवडे उडाल्याचे चित्र आता स्पष्ट झाले आहे. सांगवी परिसरात एका आरोपीने स्वतःला रिटायर एसिपी (ACP) असल्याचे सांगत एका खासगी शाळेतील शिक्षिकेवर वारंवार बलात्कार केल्याची घटना समोर आली आहे.

आरोपीने सदर शिक्षिकेला शितपेयात गुंगीचे औषध पाजून वारंवार बलात्कार केला आहे. या प्रकरणात सांगवी पोलिस स्टेशन मध्ये तोतया एसीपी विकास अवस्थी विरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अशी झाली घटना :

विकास अवस्थी नावाच्या या नराधमाने शिक्षिकेचे नग्न अवस्थेत छायाचित्र काढून तिला वारंवार शारीरिक संबध स्थापित करण्यासाठी ब्लॅकमेल केल्याचे समोर आले आहे. या गुन्ह्यातील आरोपी हा किराणा दुकान चालक असून तो बेकायदेशीररित्या खाजगी सावकारीचा व्यवसाय देखिल करायचा. तो पीडितेला रिटायर्ड एसीपी असल्याची बतावणी करत होता. त्यामुळे पीडित शिक्षिका विकास अवस्थी विरोधात गुन्हा दाखल करण्यास घाबरत होती. पीडित शिक्षेकेला पैशांची गरज असल्याने तिने आपल्या शाळेतील विद्यार्थीनीच्या आईच्या ओळखीने विकास अवस्थी याच्या कडे व्याजाने पैसे देण्याची मागणी केली होती.

तोतया एसीपी विकास अवस्थी याने दहा टक्के व्याज दराने पैसे देतो म्हणून पीडित शिक्षिकेला पैसे घेण्यासाठी पिंपळे-गुरव येथील आपल्या घरी बोलावले. त्यानंतर तिच्याकडून दोन ब्लॅक चेक वर साइन करून तिला गुंगीचे औषध पाजले.  शिक्षिका गुंगीत जाताच विकास अवस्थी याने पीडित शिक्षकेवर लैंगिक अत्याचार करून तिचे नग्नावस्थेतील छायाचित्रे काढली. पीडित शिक्षिकेवर बलात्कार केल्यानंतर विकास अवस्थी ने पीडितेला व्याजाने पैसे देखील दिले नाहीत.

Pune : निवृत्त ACP असल्याचे सांगून शिक्षिकेवर बलात्कार; वाचा घटनेचा सविस्तर वृत्तांत
Nashik Breaking : दारू प्यायला वीस रुपये दिले नाही म्हणून गळा चिरून हत्या!

त्यानंतर या नराधमाने पीडित शिक्षिकेला तिचे नग्नावस्थेतील छायाचित्र सोशल मिडियावर  वायरल करण्याची धमकी देत तिच्या इच्छेविरोधात वारंवार बलात्कार केला आहे.  डिसेंबर 2019 ते आगस्ट 2021 या जवळपास दोन वर्षाच्या कालावधीत पीडित शिक्षिका ही तोतया एसीपी विकास अवस्थी याच्या जाचाला सहन करत होती. अखेर पीडित शिक्षिकेने सांगवी पोलिसांकडे मदतीसाठी धाव घेत तोतया एसीपी विकास अवस्थी विरोधात गुन्हा दाखल केला. सांगवी पोलिसांनी विकास अवस्थी विरोधात बलात्कार, खंडणी तसेच अवैध सावकारी विरोधी अधिनियम कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे. गुन्हा दाखल होताच विकास अवस्थी हा फरार झाला होतो. मात्र, काही वेळा पूर्वीच सांगवी पोलिसांनी विकास अवस्थी याला मोठ्या शिताफीने अटक केली आहे.

Edited By : Krushnarav Sathe

Related Stories

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com