एका महिलेचा किती अपमान केला हे महाराष्ट्रानं पाहिलं- राणा

आमच्यावर झालेली कारवाई ही सूडबुद्धी झाली असल्याचे त्यांनी सांगितले.
एका महिलेचा किती अपमान केला हे महाराष्ट्रानं पाहिलं- राणा
Ravi RanaSaam Tv

मुंबई: आमच्यावर झालेली कारवाई ही सूडबुद्धीने झाली आहे. देशामधील जनता हे बघत आहे. राजद्रोहाच्या आरोपामध्ये अटक (Arrested) करण्यात आलेल्या अमरावतीचे आमदार रवी राणा (MLA Ravi Rana) आणि त्यांच्या पत्नी खासदार नवनीत राणा (MP Navneet Rana) यांची १२ दिवसानंतर तुरुंगातून सुटका करण्यात आली आहे. नवनीत राणा या लीलावती रुग्णालयात (hospital) दाखल आहेत. रवी राणा यांनी माध्यमांशी संवाद साधताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर (Uddhav Thackeray) चांगलीच टीकास्त्र केले आहे. त्यांनी म्हटले आहे की, ज्या राज्यांमध्ये महिलांचा सन्मान केला जातो. त्याच महाराष्ट्रात एका महिलेला चुकीच्या पद्धतीने वागणूक दिली आहे.

हे देखील पाहा-

६ दिवसाअगोदर नवनीत राणा यांची प्रकृती बिघडली होती. त्यावेळी त्यांच्यावर कोणत्याही प्रकारचे उपचार करण्यात आले नव्हते. त्यांना त्रास देण्यात आल्याने त्या दु:खी असल्याचे रवी राणा यांनी यावेळी सांगितले आहे. महाराष्ट्रामध्ये अशा प्रकारे दडपशाही कधी झाली नाही, असा आरोपही त्यांनी यावेळी केला आहे. सूडबुद्धीने आमच्यावर कारवाई झाली आहे. सरकारकडून एका महिलेचा मोठा अपमान झाला असल्याचा आरोप राणा यांनी यावेळी केला आहे. तुरुंगात नवनीत राणांना दिलेली वागणूक ही अयोग्य होती. तुरुंग प्रशासन राज्य सरकारच्या दबावाखाली आहे. तुरुंग प्रशासनाने मुख्यमंत्र्याच्या आदेशाने त्रास दिला असल्याचा आरोप राणा यांनी यावेळी केला आहे.

Ravi Rana
ग्राहकांना दणका! RBI ने वाढवला रेपो दर, कर्जाचा हप्ता वाढणार

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आता राज्यामध्ये विविध ठिकाणी सभा घेणार आहेत असे समजले आहे. राज्यात अनेक प्रश्न आहेत. वीज, खतं, उद्योगधंदे यांचे प्रश्न निर्माण झाले आहेत. ऑनलाइन शाळादेखील आता ऑफलाइन सुरू झाल्या आहेत. मात्र, मुख्यमंत्री अजून देखील ऑनलाइन येतात. राज्यामध्ये त्यांनी लोकांचे प्रश्न सोडवण्याकरिता फिरावे असे रवी राणा यांनी म्हटले आहे. महाराष्ट्राला मुख्यमंत्री आहे की नाही असा सवाल त्यांनी यावेळी केला आहे. मुंबई महापालिकेची नोटीस ही राजकीय सूडबुद्धीने बजावली असल्याचा आरोप रवी राणा यांनी यावेळी केला आहे. महापालिकेच्या पथकाने २ वेळेस आमच्या घरावर नोटीस दिली आहे. १५ वर्षाअगोदर ही इमारत आहे. त्यावेळी विकासकाला मंजुरी दिली होती. आता अचानक महापालिकेला अनधिकृत काय दिसले, असा सवाल त्यांनी यावेळी केला आहे.

Edited By- Digambar Jadhav

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.