'या' दोन विचारांवर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री एकत्र आले - रवींद्र चव्हाण

शिवसेना भाजपा सरकार पुन्हा प्रस्थापित करण्यात सुरत ते गुवाहाटी अशी ऑपरेशन कमळ राबविणारे मिशन कंट्रोलर ही कामगिरी बजविल्यानंतर रविंद्र चव्हाण आज डोंबिवलीत परतले.
Ravindra Chavan
Ravindra ChavanSaam Tv

डोंबिवली - गेले काही दिवस डोंबिवलीचे भाजप (BJP) आमदार रवींद्र चव्हाण (Ravindra Chavan) हे  एकनाथ शिंदे यांच्या सोबत होते. सुरत, गुहावटी, गोवा आणि मुबंई असा प्रवास त्यांनी केला आणि शिंदे सरकार स्थापन होताच चव्हाण यांनी डोंबिवली मधील आपल्या कार्यालयात हजेरी लावली आणि भाजप कार्यकर्त्यांनी, समर्थकांनी त्यांचा सत्कार केला. यावेळी त्यांनी हिंदुत्व आणि विकास या दोन विचारांवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) एकत्र आले आहेत असे सांगितले.

हे देखील पाहा -

आमदार चव्हाण यांनी सांगितले की, देवेंद्र फडणवीस यांनी आपल्याला त्यांच्या वागणुकीतून पक्षासाठी त्याग व समर्पण भावनेचा आदर्श घालून दिला आहे. त्याच आदर्शवर आपण एक कार्यकर्ता म्हणून वाटचाल करणं आवश्यक असून ते करत असताना हिंदुत्व आणि विकास हे समांतर नेण्याचे धोरण आपल्याला पुढे घेऊन जायचे आहे असे आमदार रविंद्र चव्हाण यांनी कार्यकर्त्यांना सांगितले.

शिवसेना भाजपा सरकार पुन्हा प्रस्थापित करण्यात सुरत ते गुवाहाटी अशी ऑपरेशन कमळ राबविणारे मिशन कंट्रोलर ही कामगिरी बजविल्यानंतर रविंद्र चव्हाण आज डोंबिवलीत परतले. त्यांचे भारतीय जनता पार्टी कल्याण जिल्ह्याच्या वतीने आज शहरात स्वागत करण्यात आले. त्या प्रसंगी ते बोलत होते.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com