‘रुपी’ बँकेला उद्यापासून टाळे! आजच घ्या पैसे काढून
मुंबई - देशातील आणखी एक सहकारी बँक बंद होणार आहे. उद्यापासून म्हणजेच 22 सप्टेंबरपासून पुण्यातील (Pune) रुपी को-ऑपरेटिव्ह बँकेला टाळे कायमचे टाळे लागणार आहे. आरबीआयने (RBI) रुपी को-ऑपरेटिव्ह बँक बंद करण्याचे आदेश दिले आहे. या बँकेची सेवा 22 सप्टेंबरपासून बंद होणार आहे. त्यामुळे खातेधारकांना 22 सप्टेंबरपासून पैसे काढता येणार नाही आहे.
रिझर्व्ह बँकेच्या मार्गदर्शक सूचनांचे पालन न केल्यामुळे रुपी बँकेचा (Rupee Bank) परवाना आरबीआयकडून रद्द करण्यात आला आहे. बँकेकडे पुरेसे भांडवल आणि कमाईची क्षमता नसल्याने रूपी सहकारी बँकेचा बँकिंग परवाना रद्द करण्यात आला. (Rupee Bank News)
रिझर्व्ह बँकेने गेल्या काही दिवसांत अनेक बँकांवर मोठी कारवाई केली आहे. त्यात आता पुण्यातील रुपी को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेडच्या नावाचाही समावेश झाला आहे. RBI ने बँकेचा परवाना रद्द केला आहे. अशा परिस्थितीत ही सहकारी बँक 22 सप्टेंबरपासून ग्राहकांना बँकिंग सेवा देऊ शकणार नाही. बँकांची बिकट आर्थिक स्थिती पाहता, आरबीआयने अनेक बँकांचे परवाने रद्द केले आहेत, ज्यात मोठ्या संख्येने सहकारी बँकांची नावे आहेत.
बँकेकडे पुरेसे भांडवल आणि कमाईची क्षमता नसल्याने रूपी सहकारी बँकेचा बँकिंग परवाना रद्द करण्यात आला. रिझर्व्ह बँकेने ऑगस्ट महिन्यात ग्राहकांना याबाबत माहिती दिली होती. रिझर्व्ह बँकेने 10 ऑगस्ट रोजीच एक प्रसिद्धीपत्रक जारी करून याबाबत माहिती दिली होती. यामध्ये रुपी सहकारी बँक लिमिटेडचा बँकिंग परवाना ६ आठवड्यांनंतर रद्द करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले होते. यानंतर बँकेच्या सर्व शाखा बंद होतील आणि ग्राहकांना त्यांच्या खात्यातून पैसे काढता येणार नाहीत. आता 22 सप्टेंबरपासून रिझर्व्ह बँकेचे आदेश लागू होणार असून रुपी को-ऑपरेटिव्ह बँकेचे कामकाज ठप्प होणार आहे.
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.