पाच राज्यांना रेड अलर्ट; मुंबईत समुद्रात हायटाईडचा इशारा

मुंबईत समुद्रात हायटाईडचा इशारा
पाच राज्यांना रेड अलर्ट; मुंबईत समुद्रात हायटाईडचा इशारा
पाच राज्यांना रेड अलर्ट; मुंबईत समुद्रात हायटाईडचा इशाराSaam Tv

मुंबई : दक्षिण मुंबईसहित Mumbai पश्चिम उपनगरामध्ये मुसळधार पाऊस Heavy rain होत आहे. गोरेगाव Goregaon, अंधेरी, वांद्रे आणि परळ Paral या ठिकाणी जोरदार पावसाच्या सरी पडत आहेत. रस्ते आणि रेल्वे Railways वाहतूक सध्या तरी सुरळीत सुरु आहे. मुंबईला पाणीपुरवठा करणारी मिठी नदी देखील संपुर्णपणे भरून तुडूंब वाहत आहे. मुंबई मधील समुद्राला सध्या उधाण आले आहे.

हे देखील पहा-

समुद्राला हायटाईडटा चा इशारा देखील देण्यात आले आहे. भारतीय हवामान खात्याच्या मुंबई वेध शाळेने राज्यामधील ५ जिल्ह्यांना रेड अ‌ॅलर्ट Red Alert घोषित केले आहे. ५ जिल्ह्यांत कोकणामधील २ आणि पश्चिम महाराष्ट्रामधील ३ जिल्ह्यांचा यामध्ये समावेश केला आहे. भारतीय हवामान खात्याचे ज्येष्ठ अधिकारी के.एस. होसाळीकर यांनी याविषयी माहिती दिली आहे. रायगड, रत्नागिरी, पुणे, सातारा आणि कोल्हापूर या जिल्ह्यात रेड अ‌ॅलर्ट दिला आहे.

पाच राज्यांना रेड अलर्ट; मुंबईत समुद्रात हायटाईडचा इशारा
कोकणासह 'या' जिल्ह्यांना 'रेड अलर्ट'; जोरदार पावसाचा इशारा

या जिल्ह्यांत आज मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली गेली आहे. या पार्श्वभूमीवर महानगरपालिकेवतीने २४ वॉर्डांमधील यंत्रणांना सतर्कतेचा आदेश दिले आहे. यापूर्वी मुंबईमध्ये पावसाच्या हलक्या आणि मध्यम सरी पडत होते. रात्रीपासून राम मंदिर या ठिकाणी ७८ मिमी असा मागील २४ तासांचा सर्वाधिक पाऊस नोंदवला गेला आहे. कुलाबा या ठिकाणी कमाल तापमान ३१ अंश तर किमान तापमान २५.५ मिमी नोंदवले गेले आहे. सांताक्रूझ या ठिकाणी कमाल तापमान 31.1आणि किमान तापमान 25.6 अंश सेल्सिअस नोंदवले गेले. पुढील दोन दिवस रायगड, रत्नागिरी येथे तीव्र मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

Edited By- Digambar Jadhav

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com