कोकणासह 'या' जिल्ह्यांना 'रेड अलर्ट'; जोरदार पावसाचा इशारा

तर राज्यातील उर्वरित भागात हलका पाऊस पडण्याचा अंदाज
कोकणासह 'या' जिल्ह्यांना 'रेड अलर्ट'; जोरदार पावसाचा इशारा
कोकणासह 'या' जिल्ह्यांना 'रेड अलर्ट'; जोरदार पावसाचा इशाराSaam Tv

पुणे : कोकणमध्ये Kokan गेल्या दिवसांपासून मुसळधार पाऊस Rain पडत आहे. सध्या मध्य महाराष्ट्रात Maharshtra पावसाचा जोर कमी आहे. असे असले तरी तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडत आहे. मराठवाडा Marathvada , खानदेश Khandesh आणि विदर्भात Vidharbha पावसाच्या तुरळक सरी पडत आहेत.

पुढील काही दिवस कोकण, पुणे, सातारा आणि कोल्हापूर या जिल्ह्यांना रेड अलर्ट देण्यात आला आहे. तर मुंबई, रत्नागिरी, सिंघूदुर्ग आणि रायगड Raigad या जिल्ह्यांना केवळ आजसाठी रेड अलर्ट देण्यात आला आहे. तर राज्यातील उर्वरित भागात हलका पाऊस पडण्याचा अंदाज आहे. असा अंदाज हवामान विभागाच्या Meteorological Department सूत्रांनी वर्तविला आहे.

हे देखील पहा -

महाराष्ट्राच्या किनारपट्टी पासून ते कर्नाटकाची किनारपट्टीदरम्यान कमी दाबाच्या पट्ट्याची द्रोणीय स्थिती निर्माण झाली आहे. तसेच अरबी समुद्राच्या उत्तर भाग पासून आंध्र प्रदेशच्या किनारपट्टी दरम्यान पूर्व - पश्‍चिम भागांत कमी दाबाचा पट्टा सक्रिय झाला आहे. त्याचे रूपांतर चक्रीय वाऱ्यांमध्ये होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

उत्तर महाराष्ट्र आणि तेलंगणापर्यंत हा पट्टा आहे. हा पट्टा समुद्रसपाटीपासून ३.१ आणि ४.५ किलोमीटर उंचीवर असल्याची माहिती देण्यात आली आहे. त्यामुळे कोकणातील अनेक भागांत पावसाचा जोर कायम आहे . मध्य महाराष्ट्र, खानदेश मराठवाडा आणि विदर्भाच्या अनेक भागांत ढगाळ वातावरण कायम राहणार आहे. पुढील काही दिवस अशीच स्तिथी कायम राहणार अशी माहिती देण्यात आली आहे. महाराष्ट्रातील अनेक भागांच्या कमाल तापमानात घट झाली असून किमान तापमानात देखील किंचित घट झाली आहे.

कोकणासह 'या' जिल्ह्यांना 'रेड अलर्ट'; जोरदार पावसाचा इशारा
आज संत भार वाखरी येथील पालखीतळावर दाखल होणार

या जिल्ह्यात होणार जोरदार पाऊस

१९ जुलै २०२१ - संपूर्ण कोकण, मुंबई, पुणे, सातारा, उस्मानाबाद, बीड, कोल्हापूर, सांगली, सोलापूर, लातूर, वाशीम, अमरावती, नागपूर, यवतमाळ

२० जुलै २०२१ - संपूर्ण कोकण, पुणे, भंडारा, नागपूर, सातारा, कोल्हापूर

२१ जुलै २०२१ - संपूर्ण कोकण, पुणे, हिंगोली, नांदेड, अकोला, अमरावती, वाशीम, सातारा, कोल्हापूर, परभणी

२२ जुलै २०२१ - संपूर्ण कोकण, पुणे, गोंदिया, सातारा, कोल्हापूर आणि भंडारा

Edited By - Shivani Tichkule

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com