मुंबईसह या जिल्ह्यांना रेड अलर्ट जाणून घ्या

मागील २ दिवसात महाराष्ट्राची राजधानी मुंबई मध्ये मुसळधार पावसाने चांगलेच झोडपून काढले आहे.
मुंबईसह या जिल्ह्यांना रेड अलर्ट जाणून घ्या
मुंबईसह या जिल्ह्यांना रेड अलर्ट जाणून घ्याSaam Tv

मुंबई : मागील २ दिवसात महाराष्ट्राची Maharashtra राजधानी मुंबई Mumbai मध्ये मुसळधार पावसाने चांगलेच झोडपून काढले आहे. मुंबईमधील अनेक रस्ते तुंडुंब भरल्याने, परिसरातील पूरजन्य परिस्थिती निर्माण झालेली आहे. परिणामी मुंबईमधील जन- जीवन विस्कळीत झाले आहे. अनेक रस्त्यांचे मार्ग देखील बदलण्यात आले आहे. Red alert to these districts including Mumbaidvj97

मुंबई विमानतळाच्या धावपट्टीवरसहित मोठ्या प्रमाणात पाणी साचले आहे. यामुळे विमान उड्डाणाच्या वेळेत बदल करण्यात आले आहेत. आज मुंबई सहित उपनगरामध्ये जोरदार पावसाची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे. मुंबईसह ठाणे Thane व रायगड Raigad जिल्ह्यांना हवामान विभागाने रेड अलर्ट दाखवले आहे. त्यामुळे येत्या पुढील २४ तासांमध्ये या जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी अतिवृष्टी होण्याची शक्यता वर्तवली आहे.

हे देखील पहा-

मुंबईसह या जिल्ह्यांना रेड अलर्ट जाणून घ्या
रायगडातील नद्यांनी ओलांडली धोक्याची पातळी; जिल्ह्यात रेड अलर्ट जारी

याबरोबरच मुंबई विमानतळाच्या धावपट्टीवर देखील मोठ्या प्रमाणात पाणी साचले आहे. यामुळे विमान Aircraft उड्डाणांच्या वेळापत्रकामध्ये बदल होण्याची शक्यता आहे. तसेच शुक्रवारी झालेल्या, मुसळधार पावसाने लोकल रेल्वेदेखील उशिरा धावत आहे. विशेष म्हणजे, मागील २४ तासामध्ये मुंबईत तब्बल २५३.३ मिमी पावसाची नोंद करण्यात आली आहे.

मागील १२ वर्षात तिसऱ्यांदाच जुलै महिन्यात मुंबई मध्ये इतका मोठा पाऊस पडला आहे. पुढील १- २ दिवसांत मुंबई मध्ये पावसाचा जोर कमी होण्याची शक्यता वर्तवली आहे. सांताक्रूझ Santa Cruz वेधशाळेने दिलेल्या माहितीनुसार, १ जूनपासून मुंबईत १,५४४.९ मिमी पावसाची नोंद करण्यात आली आहे. हा आकडा सरासरी पावसापेक्षा ६०९.१ मिमीने कमी आहे. यामुळे राज्यात काही विभागात मुसळाधार पावसाच्या सरी कोसळत असल्याने, तरी राज्यात अनेक ठिकाणी अपेक्षित पाऊस झालेला नाही. Red alert to these districts including Mumbaidvj97

Edited By- Digambar Jadhav

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com