12 आमदारांच्या निलबंनाबद्दल शरद पवार म्हणाले...चुकीचं वागणाऱ्यांना शिक्षा होणारच!

भारतीय जनता पार्टीच्या १२ आमदारांचं एका वर्षासाठी निलंबन करण्यात आलं. त्यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आपले मत व्यक्त केले आहे.
शरद पवार
शरद पवारSaam Tv

बारामती : ''विधानसभेत गोंधळ झाला, त्यावर शिक्षाही झाली, विधानसभेने त्यावर निर्णय घेतला. आता ते जुनं काय उकरुन काढायचं ज्यांनी चुकीचं काम केलं असं विधानसभेला वाटलं, त्यांनी त्यांच्याबद्दल एक वर्ष शिक्षेचा निर्णय घेतला'', अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद (Sharad Pawar) पवार यांनी व्यक्त केली आहे.

काही दिवसांपुर्वी विधानसभेचे दोन दिवसीय अधिवेशन (Assembly session) पार पाडले. त्यात झालेला गोंधळ संपुर्ण महाराष्ट्राने पाहिला. त्यात भारतीय जनता पार्टीच्या 12 आमदारांचं एका वर्षासाठी निलंबन करण्यात आलं. त्यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आपले मत व्यक्त केले आहे.

शरद पवार
चंद्रपूरातल्या बारमालकाने केली चक्क वडेट्टीवारांच्या फोटोची पूजा

काँग्रेस आणि शिवसेना स्वबळाचे नारे देत आहेत, त्याबद्दल विचारले असता पवार म्हणाले, "प्रत्येकजण आपला राजकीय पक्ष मोठा करण्याचा प्रयत्न करत असतो. त्यामुळे ते आपलं बळ वाढवण्याच्या प्रयत्नात असणार, शिवसेनेने जी भुमिका घेतली, यात काहीही चुकीचं नाही. आम्ही सरकार एकत्र चालवतो, याचा अर्थ आम्ही पक्ष एकत्रित चालवत नाही. आम्ही प्रत्येकजण पक्ष वेगवेगळ्या पद्धतीने चालवतो. प्रत्येकाला आपल्या पक्षाची व्याप्ती वाढावी अशी इच्छा असणार, त्यामुळे यात काहीही चुकीचे नाही. परंतु सरकार चालविताना एका विचार आहे की नाही हे महत्त्वाचे आहे.''

विधासभा अध्यक्षपदाबाबत बोलताना पवार म्हणाले, "विधान सभेच्या अध्यक्ष पदाबाबत आमच्या तिन्ही पक्षाचा निर्णय स्पष्टपणे झाला आहे. विधान सभा अध्यक्ष पद हे काँग्रेसला गेलेले आहे. त्यामुळे काँग्रेस पक्ष ठरविल ती व्यक्ती अध्यक्ष होईल. काँग्रेस पक्ष देईल त्या व्यक्तीला आमच्या तिन्ही पक्षाची मान्यता असेल,'' समान नागरी कायद्याविषयी देशात चाललेल्या परिस्थितीवर शरद पवार यांनी आपले मत व्यक्त केले. ते म्हणाले, ''केंद्र सरकार याबाबत निर्णय घेत नाही, तोपर्यंत यावर भाष्य करणं योग्य राहणार नाही. केंद्र सरकार काय करतय यावर आमचं लक्ष आहे. त्यामुळे यात गैरसमज असण्याचं कारण नाही.''

Edited By: Pravin Dhamale

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com