'मविआ' सरकारचे काम कळवा आणि बक्षीस मिळवा; पुणे भाजपची अभिनव स्पर्धा!

राज्यात गेल्या दीड वर्षात सत्तेत असलेल्या महाविकास आघाडी सरकारने पुणे शहरासाठी केलेले एक भरीव विकासकाम दाखवा आणि रोख बक्षीस मिळवा अशी अभिनव स्पर्धा आज पुणे भाजपने आयोजित केली आहे.
'मविआ' सरकारचे काम कळवा आणि बक्षीस मिळवा; पुणे भाजपची अभिनव स्पर्धा!
'मविआ' सरकारचे काम कळवा आणि बक्षीस मिळवा; पुणे भाजपची अभिनव स्पर्धा!SaamTv

पुणे : राज्यात गेल्या दीड वर्षात सत्तेत असलेल्या महाविकास आघाडी सरकारने पुणे शहरासाठी केलेले एक भरीव विकासकाम दाखवा आणि रोख बक्षीस मिळवा अशी अभिनव स्पर्धा आज पुणे शहर भाजपचे अध्यक्ष जगदीश मुळीक यांनी जाहीर केली.Report the work of the 'MVA' government and get a reward

हे देखील पहा-

मुळीक म्हणाले, 'राज्यात भाजपचेBJP Goverment सरकार सत्तेत असताना खूप मोठ्या प्रमाणात विकासकामे झाली. मेट्रो,PuneMetro पीएमआरडीएचीPMRD स्थापना, पुणे विकास आराखड्याला मान्यता, भामा आसखेड पाणीपुरवठा प्रकल्प, समान पाणीपुरवठा प्रकल्प, स्वारगेट मल्टी ट्रान्सपोर्ट हब, चांदणी चौक बहुउद्देशीय वाहतुक प्रकल्प, बस खरेदी, कॅन्टोन्मेंट बोर्डासाठी विकासनिधी अशा विविध प्रकल्पांमुळे शहराच्या नियोजनबद्ध विकासाला चालना मिळाली. काँग्रेस राष्ट्रवादीच्या कारकीर्दीत शहराचा विकास खुंटला होता. भाजप सत्तेत आल्यावर पुढील ५० वर्षांचा वेध घेत शहरात पायाभूत सुविधा निर्माण करण्यास सुरुवात झाली.'

'मविआ' सरकारचे काम कळवा आणि बक्षीस मिळवा; पुणे भाजपची अभिनव स्पर्धा!
आता आश्‍वासन नको,नगरपंचायतची घोषणा करा; हिवरखेड वासियांची मागणी

'मात्र राज्यात महविकास आघाडी सत्तेत आल्यानंतर पुन्हा शहराच्या विकासाला खीळ बसली आहे. गेल्या दीड वर्षांत शहरासाठी एकही नवीन प्रकल्प आणता आला नाही. उलट सुरू असलेल्या विकासकामात खोडा घालण्यात आला. साथीच्या आजारांची जबाबदारी राज्य सरकारवर असताना पुण्याला वाऱ्यावर सोडले. यांना साधे जंबो कोविड सेंटरचे व्यवस्थापन करता आले नाही. शहराला कोणताही निधी उपलब्ध करून दिला नाही. आपले अपयश झाकण्यासाठी राष्ट्रवादीचे शहराध्यक्षNCP अतिशय केविलवाणे वर्तन करीत आहेत, त्यांची पुणेकर कीव करतात अशा शब्दात मुळीक यांनी राज्य सरकारवर निशाना साधला.

शिवाय महविकास आघाडी सरकार भ्रष्टाचारी,Corrupt स्त्रियांवर अन्याय करणारे आहे. या सरकारमधील माजी गृहमंत्री फरारFormer Home Ministerआहेत. महिलांवर अत्याचार करणाऱ्या मंत्र्याला राजीनामा द्यावा लागला. जनतेच्या हिताचा कोणताच निर्णय सरकारला घेता आला नाही. गोंधळलेल्या सरकारला घेतलेले निर्णय परत घेण्याची नामुष्की ओढवली. विकासकामांच्या नावाने हातात भोपळा आहे. त्यामुळे जनतेमध्ये प्रचंड असंतोष आहे. याच भीतीने राष्ट्रवादीची नौटंकी सुरू आहे. याला उपरोधिकपणे उत्तर देण्यासाठी ही स्पर्धा आयोजित केली आहे. त्याची उत्तरे ९९२२७४४६४४या व्हॉट्सॲप नंबरवर पाठवावीत. योग्य व समाधानकारक उत्तर देणाऱ्या पहिल्या तीन स्पर्धकांना प्रत्येकी पंधरा हजार रुपयांचे बक्षीसReward दिले जाणार असल्याची घोषणा मुळीक यांनी केली आहे.

Edited By-Jagdish Patil

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com