BJP News : कर्नाटक निवडणुकीच्या निकालाचा धसका? महाराष्ट्र भाजपमध्ये मोठ्या फेरबदलाचे वारे

Reshuffle in BJP: राज्यातील भाजपचे ७० टक्के जिल्हाध्यक्ष बदलले जाणार आहे.
BJP
BJP saam tv

जयश्री मोरे

Reshuffle in BJP : कर्नाटक विधानसभेच्या निकालाचे परिणाम राज्यातही दिसू लागले आहे. कर्नाटकच्या निकालानंतर महाविकास आघाडी बैठकांचा सिलसिला वाढला आहे. आगामी निवडणुकांची तयारी जोमाने सुरु करण्यात आली आहे. दर दुसरीकडे भाजपने कर्नाटकच्या पार्श्वभूमीवर सावध पवित्रा घेत राज्यातील पक्ष आणखी मजबूत करण्याच्या हालचाली सुरु केल्या आहेत.

राज्य कार्यकारिणीच्या बैठकीनंतर महाराष्ट्र भाजपामध्ये मोठ्या फेरबदलाचे वारे वाहू लागले आहेत. भाजपकडून संघटनात्मक पातळीवर सर्व पदाधिकाऱ्यांची फेरनियुक्त्या केल्या जाणार असल्याचं बोललं जात आहे. आगामी निवडणुकांचा विचार करुन भाजप वेगळ्या प्रकारची रचना करण्याचा विचार करत आहे. (Latest Marathi News)

BJP
Maharashtra Politics: 'अन् मातोश्रीमध्ये बोलावून बटाटेवडे भरवायचे'; केजरीवालांच्या वक्तव्याच्या आडून फडणवीसांची ठाकरेंवर टीका

भाजपचे ७० टक्के जिल्हाध्यक्ष बदलले जाणार

राज्यातील भाजपचे ७० टक्के जिल्हाध्यक्ष बदलले जाणार आहे. तरुण पदाधिकाऱ्यांना जिल्हास्तरावर संधी भाजपकडून दिली जाणार आहे. जुन्या जिल्हाध्यक्षांच्या अनुभवानुसार त्यांची लोकसभा निवडणूक प्रमुखपदी नियुक्ती केली जाणार आहे. (Political News)

BJP
Monsoon Update: येत्या दोन दिवसात मान्सूनपूर्व पाऊस कोकणात बरसणार; हवामान विभागाचा अंदाज

पक्षांतर्गत पालकमंत्री

जुन्या जिल्हाध्यक्षांना लोकसभा मतदारसंघ बांधणीची जबाबदारी दिली जाणार आहे. तालुकाध्यक्ष आणि इतर महत्त्वपूर्ण पदाधिकाऱ्यांच्या नव्याने नेमणुका होणार आहेत. भाजपकडून जिल्हानिहाय संघटनात्मक दृष्टीने पक्षांतर्गत पालकमंत्र्यांची घोषणा केल्या जाणार आहेत. तर विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर २८८ मतदारसंघात नव्या नियुक्त्या दिसण्याची शक्यता आहे.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com