Doctors Strike: निवासी डॉक्टरांचा संप मागे, रुग्णांना मोठा दिलासा

मी काही दिवसांपूर्वीच हॉस्टेलला भेट दिली होती. हॉस्टेलमध्ये वाईट अवस्था आहे, हे मी मान्य करतो, असं गिरीश महाजन यांनी म्हटलं.
Docters
DoctersSaam Tv

मुंबई : गेल्या दोन दिवसांपासून सुरु असलेला मार्डच्या निवासी डॉक्टरांनी आपला संप मागे घेतला आहे. मंत्री गिरीश महाजन यांच्यासोबतच्या बैठकीत झालेल्या सकारात्मक चर्चेनंतर डॉक्टरांनी हा निर्णय घेतला आहे.

डॉक्टरांच्या हॉस्टेलचा विषय होता. त्यावर बोलताना मंत्री गिरीश महाजन यांनी सांगितलं की, मी काही दिवसांपूर्वीच हॉस्टेलला भेट दिली होती. हॉस्टेलमध्ये वाईट अवस्था आहे, हे मी मान्य करतो. मी प्राधान्याने हा विषय हाती घेतला आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाकडे 12 ते 15 कोटी दिले आहेत. येत्या 2-3 महिन्यात आणखी फंड आणू आणि त्यानंतर काम सुरू होईल.

Docters
MHADA Lottery: म्हाडाची घरे घेणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी; म्हाडानं लॉटरी प्रक्रियेत केले बदल

केंद्र शासनाकडे 500 कोटींची मागणी करत आहे, सीएसआर कंपन्यांकडे देखील हॉस्टेल बांधण्यासाठी मदतीची मागणी केली आहे. विद्यार्थ्यांना निवासाची सोय करून दिली जाईल असेही महाजन म्हणाले.

तसेच महापालिकांच्या प्रश्नांबाबत आयुक्तांशी चर्चा केली आहे असेही महाजन म्हणाले. संघटनेसोबत सकारात्मक चर्चा झाल्यानंतर त्यांनी संप मागे घतल्याचे देखील ते म्हणाले.

Docters
राज्यातील ८६००० वीज कर्मचारी आज रात्रीपासून संपावर जाणार, पगारवाढ नाही तरी 'ही' आहे प्रमुख मागणी

संपकरी डॉक्टरांची प्रमुख मागण्यांपैकी एक मागणी होती की, वरिष्ठ निवासी डॉक्टरांच्या 1432 जागांची पद भरती करावी. यावर गिरीश महाजनांनी आश्वासन दिलं की, वरिष्ठ निवासी डॉक्टरांची 1432 पदे दोन ते तीन दिवसांमध्ये भरली जातील. विद्यार्थ्यांचे इतर प्रश्न देखील सोडवले जातील असं अश्वासनही त्यांनी दिलं आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com