आरोग्य सेवेच्या परीक्षेचा निकाल लावु नका; विद्यार्थी चढणार कोर्टाची पायरी

आरोग्य सेवेच्या परीक्षेचा निकाल लावण्याच्या निर्णयावर आक्षेप घेत विद्यार्थ्यांनी थेट कोर्टाची पायरी चढण्याचा निर्णय घेतला आहे.
आरोग्य सेवेच्या परीक्षेचा निकाल लावु नका; विद्यार्थी चढणार कोर्टाची पायरी
आरोग्य सेवेच्या परीक्षेचा निकाल लावु नका; विद्यार्थी चढणार कोर्टाची पायरीSaam Tv

मुंबई : सरकारने आरोग्य विभागाच्या गट क आणि ड च्या परीक्षेचा निकाल लावायची तयारी सुरु केली आहे. सामान्य प्रशासन विभागाचे राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी साम टिव्हीला ही माहिती दिली आहे. या निकाल लावण्याच्या निर्णयावर आक्षेप घेत विद्यार्थ्यांनी थेट कोर्टाची पायरी चढण्याचा निर्णय घेतला आहे.

आरोग्य विभागाची परीक्षा पुढे ढकलण्यात आल्याने विद्यार्थ्यांना अनेक तांत्रिक अडचणी चा सामना विद्यार्थ्यांना करावा लागला होता. सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने गट क आणि ड प्रवर्गामधील कर्मचाऱ्यांची भरती करण्यात येत होती. याकरिता शनिवार (ता. २५) आणि रविवार (ता. २६) सप्टेंबर लेखी परीक्षा आयोजित करण्यात आली होती. त्यानंतर ही परीक्षा ३१ ऑक्टोबर रोजी घेण्यात आली होती. परंतु आरोग्य विभागाचा गट -ड चा पेपर रात्रीच फुटला होता. अनेक विद्यार्थ्यांना इन्स्टाग्रामवर पेपर फुटल्याची माहिती मिळाली होती. सुरवातीपासून आरोग्य विभागाच्या परीक्षांमध्ये या ना त्या कारणाने गोंधळ होत आला, त्यामुळे पेपर फुटल्याने विद्यार्थ्यांनी नाराजी व्यक्त केली होती. यासाठी विद्यार्थ्यांनी या परीक्षेचा निकाल लावू नये अशी मागणी केली होती.

सार्वजनिक आरोग्य विभागातील गट ड ची भरती :

- राज्यातील सुमारे ४ लाख ३० हजार उमेदवारांनी भरले होते अर्ज

- भंडारा जिल्ह्यातील केंद्रावर २५० विद्यार्थ्यांचे बैठक क्रमांक देण्यात आले नाही, तिथे उशीर झाला

- मोहाडी सह काही केंद्रांवर सील नसलेल्या लिफाफ्यातून प्रश्नपत्रिका आल्याचे विद्यार्थ्यांचे म्हणणे.

उमेदवारांच्या प्रवेश पत्राबाबत प्रचंड गोंधळ;

मात्र, परीक्षेकरिता उमेदवारांच्या प्रवेश पत्राबाबत प्रचंड गोंधळ होता. यामुळे ही परीक्षा रद्द करण्यात आली होती. ती पुढे ढकलण्यात आल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली होती. याबाबत न्यासा नावाच्या कंपनीकडे राज्य सरकारने भरती प्रक्रियेचे काम दिले होते.

उमेदवारांना कोणत्या अडचणी आल्या होत्या ?

- परिक्षा ४ दिवसांवर असताना अभ्यासक्रमाची विद्यार्थ्यांना कल्पना नाही

- अनेकांचे प्रवेशपत्र आणखी मिळाले नाही

- प्रवेशपत्रावर फोटो, केंद्र आणि वेळ नाही

- २ पदासाठी अर्ज केलेल्या उमेदवारांना २ ठिकाणी एकाच दिवशी परिक्षा देणे अशक्य

- संकेतस्थळ अनेकदा हँग होत आहे अस्या अडचणी विद्यार्थ्यांना आल्या होत्या.

Related Stories

No stories found.
Latest and Breaking News in Marathi | Live Marathi News Updates | live tv streaming in Marathi | Saam TV
www.saamtv.com