Raigad News : रेवदंडा खाडीवरील पुल अवजड वाहतूकीसाठी बंद

जिल्हाधिकारी यांनी काढला आदेश.
raigad news, alibag, murud
raigad news, alibag, murudsaam tv

- सचिन कदम

Raigad News : अलिबाग (alibag) आणि मुरुड (murud) या दोन तालुक्यांना जोडणारा रेवदंडा खाडीवरील पुल (revdanda bridge) अवजड वाहनांना वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. हा पुल नादुरुस्त झाल्याने हा निर्णय घेण्यात आला असून त्याबाबतचे आदेश रायगड जिल्हाधिकारी यांनी काढले आहेत. (Breaking Marathi News)

raigad news, alibag, murud
Parshuram Ghat Traffic Update : परशुराम घाटातील वाहतुक सुरु; Social Media तील पत्रामुळे उडाला गाेंधळ

सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अहवालानंतर रायगड जिल्हाधिकारी डॉ. योगेश म्हसे यांनी पुलावरून पाच टनावरील वाहतूक बंद करण्याचे आदेश जारी केले आहेत. छोट्या वाहनांच्या वाहतुकीसाठी हा पुल खुला आहे. अवजड वाहनांनी पर्यायी मार्गाचा वापर करावा असे अवाहन रायगड जिल्हाधिकारी आणि सार्वजनिक बांधकाम विभागा मार्फत करण्यात आला आहे.

raigad news, alibag, murud
Saam Impact : आश्रमातून Chulivarcha Baba गायब, दरबार भरलाच नाही (पाहा व्हिडिओ)

त्यामुळे वाहतुकदारांनी रोहा किंवा तळा या पर्यायी मार्गाचा अवलंब करावा लागणार आहे. तरी वाहतुकदारांनी रेवदंडा खाडीवरील पुल अवजड वाहनांना वाहतुकीसाठी बंद करण्यात आला याची नाेंद घ्यावी.

Edited By : Siddharth Latkar

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com