Thane Accident News : भीषण अपघातात रिक्षाने जागीच पेट घेतला; महिला आत अडकली अन्...

Rickshaw Accident News: वाहन चालक गंभीर जखमी झाला आहे. त्यामुळे त्यावर नजिकच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
Thane Accident News
Thane Accident NewsSaam TV

Accident News : ठाण्यात एक मोठी दुर्घटना घडली आहे. रिक्षावरील ताबा सुटल्याने वाहन थेट डिवायडरवर आदळले. यामुळे वाहनाला भीषण आग लागली. या घटनेत एका महिलेचा मृत्यू झालाय. तर वाहन चालक गंभीर जखमी झाला आहे. त्यामुळे त्यावर नजिकच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. (Thane News)

मिळालेल्या अधिक माहिती नुसार, ठाण्यातील (Thane) घोडबंदर रोडवरील गायमुख येथे ही घटना घडली आहे. वाहन चालकाचा ताबा सुटल्याने अपघात घडला आहे. महिला ही रिक्षातून प्रवास करत होती. हा अपघात इतका भीषण होता की, रिक्षा (Auto) जेव्हा डिवायडरवर आदळली तेव्हा रिक्षाने थेट पेट घेतला. रिक्षाला आग लागताच रस्त्यावर एकच धांदळ उडाली.

Thane Accident News
Mumbai Crime news: WhatsApp कॉल करून बँक खाते करायचे रिकामे; असे अडकले पोलिसांच्या जाळ्यात

वाहन चालकाने पटकन यातून बाहेर उडी घेतली. मात्र महिला रिक्षातच अडकून पडली. बाहेर पडता न आल्याने महिलेचा यात मृत्यू झाला आहे. चालक देखील गंभीर जखमी झाला आहे. त्याचावर उपचार सुरू आहेत. चलकाचे नाव राजेश यादव असे असून गायमुख येथून ठाण्याच्या दिशेने तो येत होता.

सदर घटना ही पहाटे ६ च्या सुमारास घडली. घटनेची माहिती मिळताच पोलिस आणि अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेतली. आगिवत तात्काळ नियंत्रण मिळवण्यात यश आले आहे.

Thane Accident News
Mumbai-Goa Express Way Accident: भीषण अपघातात पती-पत्नीची ताटातूट; पतीचा जीव वाचला पण पत्नीचा मृत्यू

अख्ख्या कुटुंबासाठी ठरली काळरात्र; झोपेत असतानाच घराला भीषण आग

बिहारच्या मुझपूरमध्ये काल आगीची अशीच एक धक्कादायक घटना घडली आहे. मध्यरात्रीच अचानक घराला आग लागल्याने एकाच घरातील चौघांचा मृत्यू झाल्याची दुर्देवी घटना उघडकीस आली आहे. रामदयाळू स्थानकाजवळील झोपडपट्टी वसाहतीतील ही घटना आहे. या दुर्देवी घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली असून कुटूंबियांवर शोककळा पसरली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, बिहारमधील (Bihar) मुझफ्फरपूरमध्ये काल रात्री उशिरा झोपडीला आग लागल्याने हाहाकार माजला. या आगीत घरात झोपलेल्या 4 मुली जिवंत जळाल्याची माहिती समोर आली आहे. तर दुर्घटनेत ५ जण गंभीर भाजले आहेत. रात्री उशिरा या झोपडीला आग लागली. ज्यामध्ये घरात झोपलेल्या नरेश राम यांच्या चार मुलींचा दुर्देवी मृत्यू झाला.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com