पुणे पुन्हा हादरलं! रिक्षा चालकाचा सहा वर्षाच्या मुलीवर बलात्कार

पुण्याच्या वानवडी गॅंग रेप प्रकरण ताजे असतानाच आज पुण्यात आणखीन एक बलात्काराची घटना घडली आहे.
पुणे पुन्हा हादरलं! रिक्षा चालकाचा सहा वर्षाच्या मुलीवर बलात्कार
पुणे पुन्हा हादरलं! रिक्षा चालकाचा सहा वर्षाच्या मुलीवर बलात्कारसागर आव्हाड

सागर आव्हाड

पुणे : पुण्याच्या वानवडी गॅंग रेप प्रकरण Wanwadi gang rape case ताजे असतानाच आज पुण्यात आणखीन एक बलात्काराची घटना घडली आहे. कालच्या बलात्काराच्या घटनेतून पुणे शहर सावरले नसतानाच गुरुवारी पहाटे आणखी एक धक्कादायक प्रकार पुणे स्टेशन Pune Railway Station परिसरात घडला. एका रिक्षा चालकाने Auto Rickshaw Driver सहा वर्षाच्या मुलीचे अपहरण Kidnapping केले आणि तीच्यावर बलात्कार Rape केला. याप्रकरणी पुण्याच्या बंडगार्डन पोलिसांनी Bundgarden Police Station काही तासातच आरोपींला जेरबंद सुद्धा केले आहे.

याप्रकरणी पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार, पिडीत मुलीचे कुटूंब पुणे स्टेशन बस स्थानकालगत Pune Bus Stand राहते. आज पहाटे पिडीता तिच्या आईच्या कुशित झोपली होती आणि त्यावेळेस नराधम रिक्षाचालकाने तीला उचलून रिक्षात ठेवले. आणि यानंतर त्याने रिक्षा थेट मार्केटयार्ड Market Yard येथील एका पडलेल्या इमारतीजवळ नेली. तेथे नेऊन इमारतच्या वरच्या मजल्यावर तिच्यावर बलात्कार केला.

पुणे पुन्हा हादरलं! रिक्षा चालकाचा सहा वर्षाच्या मुलीवर बलात्कार
Marathwada Rain: मुसळधार पावसाचा फटका; दोन दिवसात 31 जणांचा बळी

दरम्यान, काही वेळाने घरच्यांना जाग आली नाही आपली मुलगी कुशीत नसल्याचे त्यांना दिसले. प्रथम त्यांनी परिसरात आजूबाजूला मुलीचा शोध घेतला. मात्र ती न मिळाल्याने त्यांनी बंडगार्डन पोलीस स्टेशन गाठले. पोलिसांनीही हुशारीने नुकत्याच घडलेल्या सामुहिक बलात्काराच्या घटनेच्या पार्श्‍वभूमीवर परिसर शोधून काढला. तसेच रेल्वे स्टेशन परिसरातील सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपींचा माग काढला आणि त्याला मार्केटयार्ड परिसरात जेरबंद केले. तर पिडीत मुलीला उपाचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

Edited By-Sanika Gade

Related Stories

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com